‘ पुण्याची प्रतिमा शिक्षण क्षेत्रामुळे उंचावली ‘ : महापौर प्रशांत जगताप
पुणे :
आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या एच.एस.सी. व्होकेशनल शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने माजी विद्यार्थिनींच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन मंगळवार (दि. 26) रोजी करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.ए.आर.शेख सभागृहात झाला.
कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्नेह मेळाव्याला 300 माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या विद्यार्थिनींमधील विविध उच्च पदांवर कार्यरत असणार्या विद्यार्थिनींचा यावेळी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘पुण्याची प्रतिमा शिक्षण क्षेत्रामुळे उंचावली आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीसारख्या शैक्षणिक संस्थेचा यामध्ये मोलाचा वाटा आहे.’
‘एमसीई सोसायटी’च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एच. एस. सी. व्होकेशनल विभागाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे व मजिद उस्मान दाऊद यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या आएशा शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य गफार सय्यद यांनी प्रास्ताविक केले.