मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस जुने दिवस विसरले… एकनाथ खडसे यांच्याशी धुसफूस-मिडियाचे ‘खयाली पुलाव ‘ खडसे यांचे स्पष्टीकरण

Date:

मुंबई- सत्ता नसताना खडसे यांनी फडणवीस यांना खुपदा प्रोत्साहन दिले . फडनविसांचा तारू पुढे फडकावत ठेवला पण आता खडसेंना ओव्हरटेक करीत मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही जुन्या गोष्टी विसरून -मागे न पाहता फडणवीस हे जोमाने पुढे निघाले आहेत या कार्यभारात  त्यांच्याकडून खडसे यांच्या कामात हि  खोड्या केल्या जात असल्याने खडसे यांची धुसफूस सुरु झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे;दरम्यान आपण आजारी होतो म्हणून बैठकीला उपस्थित नव्हतो हे मिडियाचे मिडियाचे ‘खयाली पुलाव’ आहेत असे स्पष्टीकरण खडसे यांनी केले आहे राज्यातील भाजप सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बदलीसाठी शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांच्या फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोखत असल्याची धुसफूस काही दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खडसे मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे.
खडसे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या मागच्या बाकावर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी अनेक विषयांवर बोलण्याची संधी दिली. इतकी मुभा कोणताच विरोधी पक्षनेता आपल्या सहकाऱ्यांना देत नाही. तसेच प्रदेशाध्यक्षपद नियुक्तीच्या वेळीही खडसे यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात या पदाची माळ घातली. मात्र राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीस हे खडसे यांनी शिफारस केलेली कामे रोखत आहेत. खडसे यांना विश्वासात न घेता महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत, असा आरोप खडसे समर्थक आमदार करीत आहेत.
खडसे यांनी महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या शिफारशी डावलून दुसऱ्याच अधिकाऱ्यांची त्या जागांवर नियुक्ती केली. मंत्री आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी घेण्याचे मंत्र्यांना अधिकार असतात. परंतु केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मंत्र्यांच्या आस्थापनांवर हस्तक्षेप केला आहे. तसाच हस्तक्षेप फडणवीस हे खडसे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये करीत आहेत, असा खडसे समर्थकांचा आरोप आहे. गेले अनेक वर्षे खडसे यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी मंत्रिआस्थापनेवर घेतले होते. परंतु दहा वर्षांत केव्हाही मंत्री आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या भाजप सरकारमधील मंत्र्यांना करता येणार नाही, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला. त्यात खडसे यांच्या कार्यालयात घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केल्या. त्यामुळे खडसे यांनी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे एक प्रधान सचिव हे काँग्रेसच्या राजवटीत १९९९मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव होते.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंदुजा कुटुंबाने 2026 मध्ये यूकेच्या श्रीमंतांच्या यादीत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले

पुणे- हिंदुजा ग्रुप या 111 वर्षे जुन्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे संजय आणि धीरज हिंदुजा आणि कुटुंब यांनी 38 अब्ज पाऊंड संपत्तीसह सलग पाचव्या वर्षी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्ट ही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांची अधिकृत वार्षिक क्रमवारी यादी आहे.  यामध्ये 2026 च्या यादीत सुमारे 350 जणांची नावे आहेत. जागतिक आव्हाने आणि धोरणात्मक बदल होत असूनही हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक स्थैर्य आणि जागतिक नेतृत्व सातत्याने प्रदर्शित केले आहे. शतकाहून अधिक काळ, हिंदुजा ग्रुपचा प्रवास स्वर्गीय श्री. परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या “माझा धर्म म्हणजे असे कार्य करणे की ज्यामुळे मला इतरांना देता येईल,” या तत्त्वाच्या आधाराने  मार्गक्रमण करत आहे. हे तत्त्व आजही आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि विविध बाजारपेठांमधील समुदायांवर सकारात्मक परिणाम यामध्ये योगदान देत व्यवसाय वृद्धीसोबत समतोल राखत समूहाच्या उद्योगधंद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देत आहे. हिंदुजा ग्रुप 38 देशांमध्ये कार्यरत असून दळणवळण, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रसारमाध्यमे, प्रकल्प विकास, ल्युब्रिकंट्स आणि स्पेशालिटी केमिकल्स, ऊर्जा, रिअल इस्टेट, ट्रेडिंग आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये समूहाची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात हिंदुजा ग्रुपने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले असून वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसह शाश्वतता आणि भविष्याभिमुख नाविन्यपूर्णतेकडे धोरणात्मक वाटचाल दर्शवली आहे. व्यावसायिक साम्राज्याच्या पलीकडे हिंदुजा कुटुंब हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देखील कटिबद्ध आहे. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील परिवर्तनात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते आणि विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकते. द संडे टाइम्स रिच लिस्ट 2026 मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मान्यवर आणि प्रतिष्ठित नावांमध्ये 27.971 अब्ज पाऊंड संपत्तीसह डेव्हिड आणि सायमन रुबेन आणि कुटुंब, 26.852 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर लिओनार्ड ब्लावातनिक, 24.481 अब्ज पाऊंड संपत्तीसह इदान ओफर, 18.939 अब्ज पाऊंड संपत्तीसह गाय, जॉर्ज, अलाना आणि गॅलेन वेस्टन आणि कुटुंब, 18.177 अब्ज पाऊंड संपत्तीसह ख्रिस्तोफर हार्बोन, 16.411 अब्ज पाऊंड संपत्तीसह निक स्टोरोन्स्की, 16.006 अब्ज पाऊंड संपत्तीसह अ‍ॅलेक्स गेर्को, 15.194 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर जिम रॅटक्लिफ, तसेच 14.26 अब्ज पाऊंड संपत्तीसह इगोर आणि दिमित्री बुखमन यांचा समावेश आहे.

कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णी

जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन पुणे : कविता...

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर; 18 जूनला होणार मतदान

मुंबई-पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून,...