पुणे -महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र.४ व झोन क्र.६ तसेच अतिक्रमण
विभाग, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग व क्षेत्रिय कार्यालयाचे वतीने अनधिकृत बांधकामे व
अतिक्रमणांवर कारवाई करणेत आली. १६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत येवून सुमारे २५१४५
चौ.फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
बांधकाम विकास विभाग झोन क्र.६ च्या वतीने औंध आय टी आय रस्ता परिसरातील हॉटेल
तारीफ, मोबाईल शॉप, राजश्री मार्केट, दुर्गा कॅफे, लक्ष्मी स्टेशनरी, दिवार वाईन शॉप या मिळकतींवर
कारवाई करून १५७० चौ.फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले
सदर कारवाई करिता १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता व १ सहाय्यक, बांधकाम विकास
विभाग झोन क्र.६, १ गट पोलीस, १ जे.सी.पी., १० अतिक्रमण बिगारी घोले रोड इत्यादीच्या साह्याने
बांधकाम खात्यामार्फत कारवाई करण्यात आली.
तसेच बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ च्या वतीने लोहगाव येथील ८ मिळकतींच्या अनधिकृत
बांधकामावर कारवाई करण्यात करण्यात येऊन सुमारे २१०७५ चौ.फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
कारवाई अंतर्गत श्री लंघे, स.नं. २५६/२ खेसे पार्क जागेत तळ मजला + पहिल्या मजल्याचे
येथील आर.सी.सी. विटकामात विनापरवाना बांधकाम सुमारे २४०० चौ.फूट क्षेत्र, अरुण माने स.नं.१६६
पेक्की गुरुद्वारा कॉलनी लोहगाव जागेत तळ मजला + दुसऱ्या मजल्याचे आर.सी.सी. कामात अनधिकृत
बांधकाम सुरु केले आहे सुमारे ६०७५ चौ.फूट क्षेत्र, श्री राजेश सिंग स.नं. १६४ पेक्की लोहगाव जागेत
जोत्याचे आर.सी.सी. कामात अनधिकृतपणे बांधकाम सुमारे १२०० चौ.फूट क्षेत्र, श्री अर्जुन गुजर स.नं.१०४
लोहगाव जागेत तळ + २ मजल्याचे आर.सी.सी. कामात व विटकामात विनापरवाना बांधकाम सुमारे ५४००
चौ.फूट क्षेत्र, श्री तात्या शिवरकर स.नं. १०४ लोहगाव जागेत तळ + १ मजल्याचे आर.सी.सी. कामात व
विटकामात विनापरवाना बांधकाम सुमारे १८०० चौ.फूट क्षेत्र, श्री हनुमंत पुरके स.नं.१०५ संतनगर, लोहगाव
जागेत तळ + १ मजल्याचे आर.सी.सी. कामात व विटकामात विनापरवाना बांधकाम सुमारे १६०० चौ.फूट
क्षेत्र, श्री रमेश सोनू कांबळे स.नं. संतनगर लोहगाव जागेत तळ + १ मजल्याचे आर.सी.सी. कामात व
विटकामात विनापरवाना बांधकाम सुमारे १६०० चौ.फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
संगमवाडी टी.पी स्कीम फा.प्लॉ.नं.१८७, अक्षय कॉम्प्लेक्स, कंडोमिनियम, आयोकी, पहिला मजला
येथील कच्चे बांधकाम सुमारे २५०० चौ.फूट क्षेत्र मोकळे करून कारवाई कारवाई करण्यात आली.