मंचर विभागामध्ये त्रिसुत्रीअंतर्गत 1172 कामे, 176 नवीन वीजजोड

Date:

पुणे : महावितरणच्या मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 10) एकाच दिवशी वीजयंत्रणेची दुरुस्ती, नवीन वीजजोडण्या व वीजमीटर व देयकांसंबंधी 1172 कामे एकाच दिवशी पूर्ण करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे जुन्नर उपविभागातील केवाडी, उंडेखडक व कुसुर या गावात एकाच दिवशी 145 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राजगुरुनगर विभागातील टाकवे (वडगाव), कडूस (राजगुरुनगर) व कोयाळी (चाकण) या तीन ग्रामपंचायतींमध्ये 353 कामे पूर्ण करण्यात आली आहे. यात नवीन वीजजोडणीचे 51 एवन फॉर्म महावितरणला प्राप्त झाले आहेत. तसेच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे 222 कामे व वीजदेयके व वीजमीटरसंदर्भात विविध तक्रारी निवारणाचे 80 कामे करण्यात आली आहेत.

मंचर विभागात गावडेवाडी (मंचर), गंगापूर व पिंपळगाव (घोडेगाव), खिरेश्वर (आळेफाटा), कुसुर (जुन्नर) व निमगाव सावा (नारायणगाव उपविभाग) या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये 176 वीजजोडण्या देण्यात आल्या. यात 167 घरगुती व 9 कृषीपंपांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील कुसुर, केवाडी, उंडेखडक या गावांत एकाच दिवशी 145 वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील 90 पेक्षा अधिक वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून उर्वरित जोडण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.

यासोबतच वीजदेयकांबाबत तक्रारी निवारण, सदोष व नादुरुस्त मीटर बदलणे, मीटरचे रिंडींग घेणे आदी प्रकारचे 472 कामे करण्यात आली तर वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे 472 कामे पूर्ण करण्यात आली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री रमेश कावळे, अविनाश चौगुले, संतोष तळपे, विवेक सुर्यवंशी, जयंत गेटमे यांच्यासह 24 अभियंते व 185 कर्मचारी सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...