बेसबॉलमध्ये अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अजिंक्य

Date:

पुणे :

 अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल ने  महानगरपालिका शिक्षण मंडळ व जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित १४ वर्षांखालील बेसबॅाल स्पर्धेत गणेशखिंड मॉडर्न हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात उर्दू हायस्कूलने गणेशखिंड संघाचा १२-१ अशा होमरनने पराभव केला. विजयी संघाकडून यासिर शेख, आकिब उस्मानी, आफताब इनामदार व फझिल अन्सारी यांनी प्रत्येकी २ होमरन केल्या. पराभूत संघाकडून पार्थ शेलार याने एकमेव होमरन केली.
उपांत्य फेरीत मॉडर्न गणेशखिंड संघाने मॉडर्न शिवाजीनगर संघाचा ११-१, तर अँग्लो उर्दू बॅाईज संघाने एम. सी. एस. इंग्लिश प्रायमरी स्कूलचा ७-३ होमरनने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार , महाविद्यालयाच्या प्राचार्य परवीन शेख , एस ए इनामदार , आझम स्पोर्टस् अकादमीचे संचालक गुलजार शेख, खालिद बागवान , मजीद शेख , दानिश सय्यद यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...

१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज मुंबई,...