मातृदिनानिमित पुणे कॅम्पमधील पुलगेट येथील राजाभाऊ चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने प्रगतीशील महिला बचत गटाच्या महिला सदस्यांना ” मोफत ब्लंकेट वाटप ” करण्यात आले . यावेळी प्रगतीशील महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजना सोनवणे , उपाध्यक्षा शीतल सोनवणे , सुनिता गोरे , फातिमा शेख , सुरेखा पाटोळे आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा छाया जाधव ,पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्या संचालिका उषा माळी , स्मिता मुळीक , हेमा खत्री , मंदाकिनी गायकवाड , शकिला आपा आदी महिला भगिनीच्या हस्ते मोफत ब्लंकेट वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाचे संयोजन राजाभाऊ चव्हाण, विकास कांबळे , अजित मोहिते , विकास भांबुरे , राजेद्न शहा , राहुल जगताप , सतीश कंट्रोल्लु , विनोद परदेशी , किसन तुपे, महेंद्र गायकवाड , मोनू सिंग आदींनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी उपस्थितांना महिला बचत गटाची सामाजिक कार्याची माहिती प्रगतीशील महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजना सोनवणे माहिती दिली .