पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री यांच्याहस्ते करण्यात आले . यंदाच्या कार्यक्रमाचे ४४ वर्ष होते .
पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखानामधील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार देवराज मेहता , पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीचे संचालक अड. अर्जुन खुर्पे , मनिष शहा , माजी महापौर विठ्ठलराव लडकत , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर , अतुल गायकवाड , विनोद मथुरावाला , रुपाली बिडकर , प्रियांका श्रीगिरी , विनायक काटकर , दिनेश होले आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीचे संचालक अड. अर्जुन खुर्पे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा माळी यांनी केले तर आभार राजगुरू यांनी मानले .