पुणे :
‘ नदी पात्राचे डम्प यार्ड करू नका ‘ ! : खा . वंदना चव्हाण- आयुक्त,महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांबरोबर नदी पात्राची पाहणी
नदी पात्रात टाकलेल्या कचऱ्याची ,राडा -रोड्याची पाहणी खा. वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष सौ. अश्विनी कदम आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी केली.
पावसाळा तोंडावर आला असताना नदीमध्ये टाकण्यात येणारा राडारोडा तसेच कचरा अजूनही मनपाने काढलेला नाही याकडे खासदारांनी लक्ष वेधले . नदीपात्रात पार्किंग वाढत आहे ,कंटेनर ठेवले जात आहेत . मुरूम ,राडा -रोडा टाकला जात आहे ,काही वेळा पालिकेकडूनही राडा रोडा टाकला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली . पुण्यातील राडा रोडा टाकायचा कुठे ,याचेही नियोजन करायला हवे ‘ असे त्यांनी सांगितले .
ग्रीन ट्राब्यूनल च्या आदेशानुसार नदी पात्रात काहीही टाकायला बंदी आहे ‘ याकडे वंदना चव्हाण यांनी लक्ष वेधले
खा. वंदना चव्हाण यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष सौ. अश्विनी कदम आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह नदी पात्राची पाहणी केली आणि पावसाळ्याच्या अगोदर नदी पात्र स्वच्छ करावे याबाबत सूचना केल्या. राडा रोडा टाकण्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या
यावेळी रजनी पाचंगे ,नितीन जाधव आदी कार्यकर्तेही उपस्थित होते