ब्लॅक कॉमेडीचा उच्चांक गाठणारा “अतिथि पार्ट 1” हा चित्रपट सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनोदी मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी ५ जून २०१५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
पहिल्यांदाच एकत्र दोन्ही सिक्वल चित्रित करण्याचे धाडस “श्री प्रॉडक्शन” प्रस्तुत गिरीशकुमार व अशोक मोकरिया यांनी केलं. त्या जोडीमधला ‘अतिथि पार्ट 1’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अतिथि पार्ट 2 लवकरच प्रदर्शित होईल.
‘अतिथी पार्ट – १’ या चित्रपटाची कथा आत्माराम पूर्णे व त्यांच्या भोवती फिरते. शहरातून माघारी लोणावळ्याला स्थलांतरीत झाल्यानंतर पूर्णे कुटुंबीय हसमुखभाई नामक व्यक्तीकडून मदत घेऊन एका बंगल्याचं रुपांतर हॉटेल लॉजिंगमध्ये करुन ते चालवू लागतात. त्या हॉटेलचं नांव ‘हॉटेल अतिथी देवो भव…’ ठेवतात. पूर्णे कुटुंबियांनी हॉटेल चालू केल्यापासून येणाऱ्या अतिथीकडून तिथे विचित्र घटना घडू लागतात व त्या होणाऱ्या घटनेतून बाहेर पडण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात…… ? ‘हॉटेल अतिथी देवो भव…’ यातील अतिथि कोण आहेत? आणि काय घटना घडतात? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल.
या चित्रपटाची कथा, पटकथा व दिग्दर्शनाची धुरा आशिष पुजारी यांनी सांभाळली असून संवाद निलेश भोसले यांनी लिहिले आहेत. तर संगीत धग फेम संगीतकार आदि रामचंद्र आणि सूहीत अभ्यंकर यांचे असून धवल गणबोटे यांनी छायाचित्रणाची जवाबदारी पार पाडली आहे. तसेच टाईमपास 2 फेम त्रिकुट… साऊंड डिजाइनर रोहित प्रधान, डी-आय योगेश दीक्षित आणि लक्षवेदी प्रोमो मनीष मोरे यांचा आहे.
या चित्रपटामध्ये विजय चव्हाण अनेक वर्षानंतर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अनंत जोग, मिलिंद शिंदे, संजय खापरे, किशोर चौगुले, संजय मोहिते, किशोर नांदलस्कर यांच्याही मुख्य भूमिका असूननयन जाधव, संजीवनी जाधव, प्रशांत तपस्वी, तेजपाल वाघ, रोहित चव्हाण, अनिल नगरकर,मिलिंद ओक, प्रफुल्ल कांबळे,जाई देशमुख,प्रज्ञा चैतन्य,सेवा मोरे,अभिषेक कुलकर्णी, सागर यादव,संदीप वाघमारे, सचिन पाटील आदि कलाकारांचा समावेश आहे.