दलित पँथर संघटनेच्या राज्य सरचिटणीस पदी स्वप्नील कांबळे
पुणे – दलित पँथर महाराष्ट्र राज्य सर चिटणीस पदी स्वप्नील कांबळे यांची श्री सुखदेव (तात्या) सोनावणे यांच्या नेतृतावाखाली व कार्यकर्त्यांच्या उपस्थित पत्र देऊन हि नियुक्ती करण्यात आली.
कार्यशीलता व सामाजिक दृष्टीकोन यांचा विचार करून हि नियुक्ती करण्यात आली असून समाजाच्या सर्व क्षेत्रात विकास करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य व झोपडपट्टी- वासियांसाठी असणारी आत्मीयता व तळमळ पाहून सर्व स्तरातील लोकांपर्यंत आपल्या कार्यातून व प्रबोधनातून यशस्वीपणे पोहचवण्याची जबाबदारी या पत्रा द्वारे देण्यात आली.