झी मराठीचा ‘लय भारी’ विक्रम वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरने मोडले सर्व रेकॉर्डस्

Date:

मराठी मालिका, कार्यक्रम आणि सोहळ्यांद्वारे मराठी प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृती देणारी वाहिनी म्हणजे झी मराठी. गेल्या दिड दशकाहून अधिक काळाच्या या प्रवासात झी मराठीने आपल्या प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन देत त्यांच्या आवडी जपल्या आणि नवीन आवडीही निर्माण केल्या. अनेक यशोशिखरे गाठत मैलाचे दगड रचत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध करण्याचं काम झी मराठीने अव्यहातपणे केलंय. झी मराठीच्या याच यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय लय भारी’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरने. मागील आठवड्यात २५ जानेवारीला झी मराठीवरून लय भारी’ प्रसारीत झाला आणि त्याने एक नवा विक्रम रचला. गेल्या सात वर्षांमध्ये हिंदी आणि मराठी वाहिन्यांवरून प्रसारीत झालेल्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि अधिक प्रेक्षकांनी बघितलेला चित्रपट अशी नोंद लय भारी’च्या नावावर झाली आहे. आकडेवारीच्या किंवा टीआरपीच्या भाषेत सांगायचं झाल्यास १८८९८० जीटीव्हीटी (Gross Television Viewers in Thousand)आणि ५७२७ टीव्हीटी (Television Viewers in Thousand) कमावत या चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे लय भारीने हिंदी वाहिन्यांवरून प्रसारीत झालेल्या ‘थ्री इडियट्स’, ‘बॉडीगार्ड’, ‘सिंघम’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या प्रसारणाच्या आकडीवारीचे विक्रमही मोडीत काढले आहेत. महाराष्ट्रात केबल आणि सेट टॉप बॉक्स वापरणा-या ग्राहकांपैकी सुमारे सव्वा कोटी प्रेक्षकांनी लय भारी’चा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर बघितला हे विशेष.

 

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या लय भारी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचत मराठी चित्रपटांना ख-या अर्थाने मोठं स्वप्न दाखवलं.. बॉलिवुडमधला मराठमोळा स्टार रितेश देशमुखने लय भारीमधून मराठीत पदार्पण केलं आणि मराठीला ख-या अर्थाने ग्लॅमरस स्टार मिळाला. चांगली कथा, दमदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमुल्य, अचूक दिग्दर्शन, श्रवणीय संगीत यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अॅक्शनपॅक्ड कथा आणि दमदार संवादामुळे हा चित्रपट लोकप्रिय झालाच शिवाय यातील गाण्यांनी विशेषतः माऊली माऊली” या गीताने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.  बॉक्स ऑफिसवर तब्बल चाळीस कोटींची कमाई करत लय भारीने नवा उच्चांक प्रस्थापित केला. मोठ्या पडद्यावर लय भारीला जे यश आणि प्रेम मिळालं त्याची पुनरावृत्ती छोट्या पडद्यावरही बघायला मिळाली.

 

मागील अनेक वर्षांपासून मराठी वाहिन्यांमध्ये आपलं वर्चस्व निर्विवादपणे गाजवत झी मराठीने आपलं अग्रस्थान कायम राखलं आहे. या वाहिनीवरील मालिकांना आणि विविध सोहळ्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांसोबत असलेली ही बांधिलकी जपत झी मराठीने मनोरंजनाची अनेक दालनं उघडली. या वाहिनीवरून जे प्रसारीत होईल ते अभिरूचीसंपन्न आणि दर्जेदार असेल याची काळजीही वाहिनीने घेतली. मागच्या काही महिन्यांमध्ये प्रसारीत झालेल्या ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’ या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यात फॅंड्रीच्या प्रसारणाच्या वेळी तर सामाजिक बांधीलकी जपत जाणीव झाली बदल हवा” सारखा उपक्रम राबवत अनेक गरजू संस्थांना मदतीचा हातही दिला. लय भारी’ च्या वर्ल्ड टिव्ही प्रिमीयरसाठीही नियोजनबद्ध मार्केटींग आणि योग्य प्रसिद्धीतंत्राची पुरेपुर जोड देत झी मराठीने यशाचा हा नवा विक्रम रचला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंदुजा कुटुंबाने 2026 मध्ये यूकेच्या श्रीमंतांच्या यादीत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले

पुणे- हिंदुजा ग्रुप या 111 वर्षे जुन्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे संजय आणि धीरज हिंदुजा आणि कुटुंब यांनी 38 अब्ज पाऊंड संपत्तीसह सलग पाचव्या वर्षी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्ट ही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांची अधिकृत वार्षिक क्रमवारी यादी आहे.  यामध्ये 2026 च्या यादीत सुमारे 350 जणांची नावे आहेत. जागतिक आव्हाने आणि धोरणात्मक बदल होत असूनही हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक स्थैर्य आणि जागतिक नेतृत्व सातत्याने प्रदर्शित केले आहे. शतकाहून अधिक काळ, हिंदुजा ग्रुपचा प्रवास स्वर्गीय श्री. परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या “माझा धर्म म्हणजे असे कार्य करणे की ज्यामुळे मला इतरांना देता येईल,” या तत्त्वाच्या आधाराने  मार्गक्रमण करत आहे. हे तत्त्व आजही आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि विविध बाजारपेठांमधील समुदायांवर सकारात्मक परिणाम यामध्ये योगदान देत व्यवसाय वृद्धीसोबत समतोल राखत समूहाच्या उद्योगधंद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देत आहे. हिंदुजा ग्रुप 38 देशांमध्ये कार्यरत असून दळणवळण, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रसारमाध्यमे, प्रकल्प विकास, ल्युब्रिकंट्स आणि स्पेशालिटी केमिकल्स, ऊर्जा, रिअल इस्टेट, ट्रेडिंग आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये समूहाची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात हिंदुजा ग्रुपने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले असून वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसह शाश्वतता आणि भविष्याभिमुख नाविन्यपूर्णतेकडे धोरणात्मक वाटचाल दर्शवली आहे. व्यावसायिक साम्राज्याच्या पलीकडे हिंदुजा कुटुंब हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देखील कटिबद्ध आहे. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील परिवर्तनात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते आणि विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकते. द संडे टाइम्स रिच लिस्ट 2026 मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मान्यवर आणि प्रतिष्ठित नावांमध्ये 27.971 अब्ज पाऊंड संपत्तीसह डेव्हिड आणि सायमन रुबेन आणि कुटुंब, 26.852 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर लिओनार्ड ब्लावातनिक, 24.481 अब्ज पाऊंड संपत्तीसह इदान ओफर, 18.939 अब्ज पाऊंड संपत्तीसह गाय, जॉर्ज, अलाना आणि गॅलेन वेस्टन आणि कुटुंब, 18.177 अब्ज पाऊंड संपत्तीसह ख्रिस्तोफर हार्बोन, 16.411 अब्ज पाऊंड संपत्तीसह निक स्टोरोन्स्की, 16.006 अब्ज पाऊंड संपत्तीसह अ‍ॅलेक्स गेर्को, 15.194 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर जिम रॅटक्लिफ, तसेच 14.26 अब्ज पाऊंड संपत्तीसह इगोर आणि दिमित्री बुखमन यांचा समावेश आहे.

कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णी

जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन पुणे : कविता...

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर; 18 जूनला होणार मतदान

मुंबई-पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून,...