काठमांडू-नेपाळ येथे १२ व्या जागतिक आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये उत्तम शोधनिबंध सादरिकरणाचे ‘सिल्व्हर मेडल ’डॉ.संतोष ढगेंना मिळाले.नेपाळचे माजी गृहमंत्री श्री. दिपक बस्कोटा यांच्या हस्ते व जर्मनीचे डॉ.लोथार प्रिक आणि हॉलंडचे डॉ.किंग्जले ब्रुक्स् यांचे प्रमुख उपस्थितीत डॉ.संतोष ढगे यांना प्रदान करण्यात आले.
सदर जागतिक कॉन्फरन्स महर्षी वेदिक फाऊंडेशन नेपाळ ,सर्बियन असोसिएशन ऑफ आयुर्वेद –युरोप आणि वनौषधी विदयापीठ भारत यांनी संयुक्तरित्या नुकतीच नेपाळ येथे आयोजित केली होती.सदर जागतिक कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी भारत,जर्मनी ,नेदरलॅण्ड,सर्बिया, नेपाळ इ.देशांमधिल निवडक १०० निमंत्रित तज्ञ उपस्थित होते.पैकी निवडत तज्ञांनी आपले शोध निबंध त्याठिकाणी सादर केले.
डॉ.संतोष ढगे हे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक हद्यरोगतज्ञ म्हणून नावाजले जातात.ते पूणे आणि चिपळूण येथे रुग्णतपासणी करतात.या जागतिक कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्यांचा हातखंडा असलेल्या ‘नॅचरल बायपास थेरपि –वंडरफूल नॉनईन्वह्रॅसिव्ह (बिना शस्त्रक्रिया) ट्रिटमेंट फॉर हार्ट ब्लॉकेजेस्’ या विषयावर ३० मिनिटांचे लेक्चर देवून शोध निबंध सादर केला.सदर लेक्चरमध्ये डॉ.संतोष ढगेंनी आयुर्वेदानुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार हृद्याच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस् कसे तयार होतात ? नॅचरल बायपास थेरपी म्हणजे काय? हे सविस्तर सांगितले.ढगे हेल्थकअर मध्ये केल्या जाणा-या आयुर्वेदिक उपचारांचा फायदा कसा होतो हे संशोधन आणि वैदयकिय क्षेत्रातिल गोल्ड स्टॅण्डर्डसचा आधार घेवून प्रभाविपणे मांडले.हे सांगताना त्यांनी काही रुग्णांची उदाहरणे दिली त्यामध्ये त्यांनी रुग्णांच्या लक्षणांमध्ये कसा फरक पडला,त्यांच्या रिपोर्टस् मध्ये कसे बदल घडत गेले हेही सांगितले.सदर आयुर्वेदिक उपचारांनी रुग्णांना तुरन्त आणि दीर्घकाळ आराम मिळतो हे ही काही रुग्णांची उदाहणे देवून सांगितले.आज अखेर एक हजार पेक्षाही अधिक रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे.हा अवघड विषय सोप्या भाषेत प्रभावीपणे मांडल्याने डॉ.संतोष ढगेंना ‘सिल्व्हर मेडल ‘ प्रदान करण्यात आले.
या कॉन्फरन्समध्ये जर्मनीचे डॉ.लोथार प्रिक ,सर्बियाचे डॉ.ब्रॅंको सिसिक,हॉलंडचे डॉ.किंग्जले ब्रुक्स ,डॉ.बर्नार्ड मिशेल,नेपाळचे डॉ.रामेश्वर कोईराला,डॉ विवेकानंद संहिता शास्त्री तसेच डॉ.जॉन हेग्लीन,डॉ.फेगट्रॅवीस,डॉ.संदिप दवेल,डॉ.सतिश शिंदाडकर आदींनी आपले शोध-निबंध सादर केले.