पुणे-“एखादी कलाकृती निर्माण करताना मानसिक समाधान बरोबरच शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा तितकीच आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी FTII मधील प्रथमच बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
या प्रसंगी FTII चे संचालक भूपेंद्र कॅन्थोला, संस्थेचे दिन अमित त्यागी, रजिस्ट्रार वरुण भारद्वाज तसेच संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३००० चौरस फुट जागेत हि जिम असून विद्यार्थ्यांना ति सकाळी 4 तास व संध्याकाळी 4 तास अशी वापरता येईल. ह्या प्रसंगी खासदार शिरोळे ह्यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधतानाच त्यांच्या विविध प्रोजेक्ट विषयी तसेच संस्थेतून बाहेर पडल्यावर करियर विषयी मनमोकळेपणे चर्चा देखील केली. तसेच राजकारणातील धकाधकीत स्वत:च्या तंदुरुस्तीबद्दल नेहमी जागरूक असणाऱ्या शिरोळे ह्यांनी जिम च्या उद्घाटना प्रसंगी डम्बेलचा व्यायाम देखील केला तसेच अक्षय सर्वान , सुधाकर जगदाळे ह्यांनी बॉडी बिल्डींग प्रात्यक्षिक देखील सादर केली