चेन्नई : आघाडीचा अभिनेता चिरंजीवी परवा 60 वर्षांचा झाला . अभिनेता रामचरण तेजाने हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये त्याच्या ‘बर्थ डे’ पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली . सलमानखान ने या पार्टीत डान्स केल्याने बरीच रंगत आल्याचे सांगण्यात येते अवघ्या काही सेकंदाचे अशा डान्सचे मोबाईल व्हिदिओ यु ट्युब वर प्रसारित झालेआहेत या शिवाय अनेक वेबसाईट ने या बर्थ डे पार्टी चे असंख्य फोटो हि प्रसारित केले आहेत कमल हसन अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्रीदेवी, बोनी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, विवेक ओबेरॉय, प्रकाश राज अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती.तर दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेता नागार्जुनने सहकुटुंब हजेरी लावली. याशिवायमोहन बाबू, डग्गुबती व्यंकटेश, राणा डग्गुबती, जयाप्रदा, खुशबू, तापसी पन्नू, तमन्ना भाटियासह अनेकांनी या पार्टीमध्येसहभाग नोंदविला चिरंजीवीचा जन्म 22 ऑक्टोबर 1955ला मोगलथुर, नारासापूरम, वेस्ट गोदावरी, आंध्रप्रदेशात झाला आहे