पुणे-जीवन धकाधकीचे झाले असले तरी मनशांती मिळविणे अजिबात अवघड राहिलेले नाही जीवनातला काही वेळ मात्र त्यासाठी दिला पाहिजे असे इथे विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ दत्ता कोहिनकर यांनी सांगितले
विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ दत्ता कोहिनकर यांना सामाजिक क्षेत्रातील फिनिक्स फाउंडेशनचा “जीवनगौरव 2015” पुरस्कार मिळाल्याबद्दल कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने व्हि पी अश्वत्थराम यांच्या हस्ते युनियनच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात गौरवण्यात आले.
याप्रसंगी सतिश मुळे, सचिन घनपाठी, नवनाथ माने, गणेश घुगे, युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, राजेंद्र ढमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.