( सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, पं. शौनक अभिषेकी, पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन )
श्री संत दर्शन मंडळ आयोजित व सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून येत्या २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वा आण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे ‘भजन रंग ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा भक्तिगीतांचा हा कार्यक्रम विनामुल्य असणार आहे.
सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, पं. शौनक अभिषेकी, पं. श्रीनिवास जोशी अशा दिग्गज गायकांचे गीते रसिक प्रेक्षकांना ऐकण्याची संधी लाभणार आहे. भक्तिमय गीते यात गायली जाणार असून समस्त पुणेकरांनी या कार्यक्रमला आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश दातार यांनी केले आहे.