आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिन’ होणार साजरा
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्यावतीने ‘21 वा आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. महाविद्यालयच्या वार्षिक कार्यक्रमातंर्गत साजरा होणारा हा कार्य्रकम बुधवार, दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात होईल, अशी माहिती डॉ. इम्तियाझ हुसैन जहिद (सहाय्यक प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय) यांनी दिली.
चांगले पर्यावरण आणि पर्यावरण सुरक्षा या विषयी माहिती मिळणे आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होणे यासाठी हा दिन महाविद्यालयात दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे.