मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच आपल्या बोल्ड रुपाचा करिष्मा आता हिंदी सिनेमातदाखवणार आहे. तिच्या या आगामी हिंदी सिनेमाचे नाव आहे ‘हंटर’. खरं तर पठडीबाहेरच्या आणि बोल्ड भूमिकांसाठी सई ताम्हणकरला ओळखले जाते. तिच्या बोल्ड अवतारामुळेच ती चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे. मराठीत बिकिनी परिधान करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर आता सई ‘हंटर’मध्येही बोल्ड रुपात झळकण्यास सज्ज झाली आहे.
या सिनेमात सईने ‘सेक्सी सविता भाभी’ची भूमिका साकारली आहे. सईसोबत ‘हेट स्टोरी’ फेम अभिनेता गुलशन देवैया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सईसोबतच राधिका आपटेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमातील सीन्सप्रमाणेच संवादसुद्धा बरेच बोल्ड आहेत.
ही एका मुलाची कथा असून त्याच्या आयुष्यात येणाऱया तीन मुलींपैकी सई एक आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात राधिक आपटे आणि सई ताम्हणकरने भरपूर एक्सपोज केले आहे असे म्हणतात . येत्या 20 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.