Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ म्युझिक लाँच

Date:

 

सिने तारे-तारकांची झगमग,  बहारदार संगीताची मेजवानी अशा  जोशपूर्ण वातावरणात ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते चित्रपटाच्या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. म्युझिक लाँचच्या वेळी या सिनेमाची संपूर्ण टीम आणि विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते.  चित्रपटाचे पोस्टर लाँच व चित्रपटातील गीतांची झलक याप्रसंगी दाखविण्यात आली. वेगवेगळ्या जॉनरची ४ धमाकेदार गाणी ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ मध्ये ऐकायला मिळणार आहेत. कथानकाला साजेशी अशी सिनेमातली गाणी असून प्रफुल कार्लेकर व मधु कृष्णा या द्वयीने संगीत दिलंय.

 

यातल्या ‘रेशमी रुमाल’ या तडफदार आयटम साँगवर भाऊ कदम, गिरीजा जोशी, चिन्मय उदगीरकर,  आरती सोलंकी यांनी ताल धरलाय. शिवाय ‘तूच तू’ हे एक रोमँटिक गाणं व ‘पप्पी दे’ हे प्रसिद्ध गाणंही या सिनेमात आहे. ‘वाजलाचं पाहिजे’ हे धमाल टायटल साँग ही सगळ्यांना आवडेल असचं आहे. मंदार चोळकर व हरिदास कड यांनी चित्रपटातील गाणी शब्दबद्ध केली असून आदर्श शिंदे, रेश्मा सोनावणे, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी रोहित राऊत व प्रवीण कुंवर यांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे.

चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ हा सिनेमा विनोदी ढंगाचा आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीर  भाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे. भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची आहे. सह-निर्मात्याची जबाबदारी हेमंत अणावकर तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप यांनी सांभाळली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...