शालेय साहित्य खरेदीला विलंब-विद्यार्थी गणवेश,बूट,दप्तर,वह्यांपासून वंचित; महिनाअखेर पर्यंत साहित्य खरेदी न झाल्यास आंदोलन-संदीप खर्डेकर

Date:

पुणे-

शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गतवर्षी जुलै महिन्यात शिक्षण मंडळाचे
अधिकार काढून घेण्यात आले.स्वयंसेवी संस्था व विविध स्तरातून शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका झाल्यानंतर सर्व शालेय साहित्याची खरेदी स्थायी समिती मार्फत करण्याचा निर्णय पुणे मनपा प्रशासनाने घेतला.यामुळे वेळेवर आणि दर्जेदार साहित्य पुरविण्याचे आव्हान मनपा समोर होते व प्रशासनावर मोठी जबाबदारी होती.
मात्र प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा फटका विद्यार्थ्याना बसला असून आज शाळा सुरु होवून ९ दिवस झाले तरी अद्याप गणवेश,बूट,दप्तर,वह्या यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली नसून शालेय साहित्याचे वाटप अद्याप झालेले नाही.
प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा दुष्परिणाम विद्यार्थी भोगत असून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ३/३ वह्या देऊन त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे.
प्रशासनाने स्थायी समितीच्या माध्यमातून खरेदी प्रक्रियेला गती द्यावी व येत्या ८ दिवसात विद्यार्थ्याना सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी जनांदोलन उभारेल असा इशारा शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,शिक्षण मंडळ सदस्य  रघु गौडा,सौ.मंजुश्री खर्डेकर व किरण कांबळे यांनी दिला आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...