पुणे : ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या मुंबई प्रदेश प्रमुखपदी चेंबूरचे सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत आणि प्रवक्ते दीपक बिडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
रविवारी गोवंडी येथे झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात हे पत्र देण्यात आले. रा. स. प. महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश प्रमुखपदी सौ. राधिका धेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय कांबळे, जिल्हा अध्यक्ष संतोष चव्हाण, दक्षिण मुंबई लवटे, चेंबूर तालुकाध्यक्षपदी सुखदेव निरगुडे, चेंबूर तालुका उपाध्यक्षपदी संतोष वरक यांची नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती पत्रे देण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वांना न्याय देणारा पक्ष असून, महानगरांमधील समस्या सोडवून सामान्यजनांचे जीवन सुखकर करण्यासाठी कटीबद्ध आहे. महानगरांमधील संघटन वाढविण्यात येणार असून, त्यासाठी मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे पक्ष प्रवक्ते दीपक बिडकर यांनी यावेळी सांगितले.
प्रस्थापित आणि पारंपरिक सत्ता समीकरणे मोडून राष्ट्रीय समाज पक्ष सत्ता आणि समतेचे नवे समीकरण तयार करेल, असे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत यांनी सांगितले.
दत्ता सुरनरे, यांनी सूत्रसंचालन केले. दाजी मार्कंड यांनी आभार मानले. यावेळी लेंगरेमामा, अण्णासाहेब काळे, संतोष कांबळे, संपत ढेबे, मिलींद वरक तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्ष मुंबई प्रदेश प्रमुखपदी अजित पाटील
Date: