पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकारिणीची बैठक खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. पुणे महानगरपालिका येथील पक्ष कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे आयोजन पुणे शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी केले होते. या बैठकीत देश आणि राज्यातील वाढलेली असहिष्णूता, अस्वस्थता यावर चर्चा करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे कोंढवा पोट निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आसिफ पटेल यांनी निवडणूकीतुन माघार घेऊन उमेदवार रईस सुंडके यांना पाठिंबा दिल्याबद्दल खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते आसिफ पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीला कार्यध्यक्ष सुनिल बनकर, नगरसेवक आप्पा रेणुसे, प्रदेश सरचिटणीस नितीन ऊर्फ बबलू जाधव, राष्ट्रीय अल्पसंख्याक उपाध्यक्ष इक्राम खान तसेच महिला, युवा, जैन, शीख, खिशचन व सर्व अल्पसंख्याक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अनिस सुंडके हे सुद्धा उपस्थित होते.