पुणे कॉंग्रेस युवक कॉंग्रेसच्या वार्ड क्रंमांक ४७ मध्ये ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम राबविण्यात आला . या उपक्रमात ३७५ नागरिकांनी सहभाग घेतला . यामध्ये नागरिकांना शिधापत्रिका , जेष्ठ नागरिकांना दाखले , अधिवास प्रमाण पत्र , पेन कार्ड , `शिधा पत्रिकेचे नूतनीकरण , नावात बदल , उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून देण्यात आले . या उपक्रमाचे संयोजन पुणे कॉंग्रेस युवक कॉंग्रेसचे चिटणीस विपुल यशवंत उमंदे यांनी केले होते . भवानी पेठमधील अजमेरा सोसायटी , विशाल अपार्टमेंट , वॉचमेकर चाळ , चुडामण तालीम या भागातील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला .
या कार्यक्रमास पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , माजी राज्यमंत्री रमेश बागवे , माजी आमदार मोहन जोशी , नगरसेवक अविनाश बागवे , बंडू चरण , अड. रमेश धर्मावत व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते , नागरिक उपस्थित होते .