पटना- संध्याकाळी चार वाजता संजय गांधी जैविक उद्यानच्या गेट नंबर 1वर आमिर खान लिट्टी खाण्यासाठी पोहोचला . यावेळी तो म्हणाला बिहारची लिट्टी मुंबईत मिस करतो. म्हणून बिहारला येऊन लिट्टी खाण्याची मजाच और असते. आमिर यापूर्वीसुध्दा या दुकानात आलेला आहे.
‘मी युसूफ साहेबांचा (दिलीप कुमार) खूप मोठा चाहता आहे. ते गंगा जमुनामध्ये जशी भोजपूरी बोलले, तसेच बोलण्याची माझी इच्छा होती.’ ती पीके मध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहेर पीके’च्या प्रमोशन सुरुवात पटनामधून करण्यासाठी आलेला आमिर खान सेनेपॉलिसमध्येपत्रकारांशी बोलत होता एका प्रश्नाला उत्तर देताना भोजपूरी अंदाजात म्हणाला, ‘हमरी फिल्म बहुत फंस्टास्टिक है, इसे देखिएगा जरूर’ सिनेमात आमिरचे पात्र भोजपूरी भाषा बोलते.
पीकेमध्ये हॉलिवूड सिनेमाच्या कथेशी मिळती-जुळती पटकथेच्या प्रश्नावर आमिर म्हणाला, मला नाही वाटत, अशी कहानी कोणत्या सिनेमाची असावी. राजकुमार यांच्या मनात जे होते पडद्यावर खूप चांगल्या प्रकारे उतरले आहे.
आमिरने सिनेमाच्या कहानीवर बोलण्यास नकार दिला. त्याने सांगितले, की सिनेमा राजस्थान आणि दिल्ली बेस्ड आहे. माझे पात्र तिथेच राहून भोजपूरीमध्ये बोलते. सिनेमात भोजपूरी भाषाच का निवडली यावर आमिर म्हणाला, ‘सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी जेव्हा पीकेची मूळ पटकथा ऐकली तेव्हा त्यात माझे पात्र खडी बोली आणि अवधी भाषा बोलत होते. मी राजकुमार यांना म्हटले, आपण पात्राची भाषा भोजपूरी ठेवली तर शोभेल. पात्र जेव्हा भोजपूरी बोलेल तेव्हा वेगळा प्रभाव पडेल. त्यांना योग्य वाटले आणि त्यांनी भोजपूरी भाषा निवडली.
सिनेमांच्या गाण्यांनासुध्दा भोजपूरी भाषेचा स्पर्श आहे. दोन गाण्यांच भोजपूरी भाषेंचा वापर करण्यात आला आहे. हा एक यूनिव्हर्सल आणि फॅमिली सिनेमा आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत हा सिनेमा पाहणार आहे. प्रोमोमध्ये तू तुझ्या चेह-यावर देवाचे स्टिकर का लावतो? यावर तो हसून म्हणाला, ‘सिनेमात मला खूप मारतात. त्यामुळे मारापासून वाचण्यासाठी ही एक शक्कल लढवलेली असते.’
बिहारची लिट्टी मुंबईत मिस करतो- अमीर खान
Date: