पुणे :
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या “पै इंटरनॅशनल लर्निंग रिसोर्सेस सेंटर’तर्फे चौथ्या “पै आय टी ऑलिंपियाड’चे आयोजन करण्यात आले होते. हे ऑलिंपियाड शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी आझम कॅम्पस मध्ये घेण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या माहिती तंत्रज्ञान विषयक ऑलिंपियाडमध्ये 8 हजार विद्यार्थी देशभरातून सहभागी झाले होते. ऑनलाईन पद्धतीने हे ऑलिम्पियाड घेण्यात आले.
शालेय आणि कनिष्ट महाविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑलिम्पियाड मध्ये अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या आयेशा शेख या र्उीली -कनिष्ठ गटामध्ये तर रेवती श्रीनिवासन (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे) या ङळेपी- वरिष्ठ गटामध्ये विजेते ठरले.
पारितोषिक वितरण “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, रूपेश शहा (आयआयटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई), मुनव्वर पीरभॉय (संस्थापक, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट), रोबोमाइंड’चे संस्थापक क्रिस बास्तियापिल्ले, प्रा.इरफार शेख, ऑलिम्पियाडचे संयोजक आणि “पै इंटरनॅशनल लर्निंग सोल्युशन्स’चे प्राचार्य ऋषी आचार्य, स्वतंत्र जैन आदी उपस्थित होते.
विजेत्यांना लॅपटॉप, ऍपल आयपॅड, ऍंड्रॉईड टॅबलेट, मोबाईल अशी पारितोषिके देण्यात आली. इरफान शेख यांनी आभार मानले.