जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णत: भांडवलदारधार्जिणे असून त्यांची सर्व धोरणे ही
कामगारविरोधी आहेत. अदाणी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींचा बेसुमार विकास म्हणजे देशातील जनतेचा विकास असे मानून कामगार विरोधी धोरणे अवलंबणारे मोदी आणि त्यांचा भाजप पक्ष त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी प्रत्येक कामगाराने सज्ज व्हायला हवे. अशा परखड शब्दात टीका शिवाजीनगर मतदारसंघातील काँग‘ेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी कामगारांशी बोलताना केली. खडकी येथील कामगारांची भेट घेऊन प्रचार करताना ते बोलत होते.निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खडकी येथील अॅमिनेशन फॅक्टरी येथील कामगारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जमीर शेख, खडकी कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष मनीष आनंद, किशोर निमल, नगरसेवक कमलेश चासकर, धर्मपाल यादव आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले की, गुजरातमध्ये कोट्यवधी नागरीक विविध समस्यांनी ग्रासलेले असूनही स्वत:चे ढोल स्वत:च वाजवत नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास झाल्याचे भासवले. वास्तविक गुजरातपेक्षा महाराष्टृा कितीतरी पटीने आघाडीवर आहे. गुजरातमध्ये त्यांनी अदानी, अंबानींना अब्जावधी रुपयांचा फायदा व्हावा, यासाठी विविध सवलतींची खैरात केली. तेच धोरण ते आता देशात राबवू पाहत आहेत. असे सांगून निम्हण म्हणाले की,काँग्रेसने केलेल्या व कामगारांच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या कामगार कायद्यात बदल भांडवलदारधार्जिणे आणि कामगारविरोधी कायदे नरेंद्र मोदी आणत आहेत. त्यांच्या या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध देशातील कामगार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले. नर्मदा धरणाची उंची 15 मीटरने वाढवून अडीच लाख गरीब कष्टकरी लोकांना त्यांनी देशोधडीला लावले. लाखो आदीवासिंचे जीवन उद्ध्वस्त करून भांडवलदारांना उद्योगासाठी पर्यावरण परवानगी देण्याचा त्यांनी सपाटाच लावला. तसेच देशातील रेल्वे व्यवस्था सुधारून सर्वसामान्य कष्टकरी जनतेला चांगली रेल्वे सेवा देण्याऐवजी अदानी, अंबानींसार‘या बड्या भांडवलदारांचे खिसे गरम राहावेत यासाठी 70 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. या भांडवलदारांच्या हितासाठी कामगारविरोधी निर्णय घेतील, यासाठी त्यांना कडाडून विरोध करीत भाजपला पराभूत करा, असे आवाहन निम्हण यांनी केले.
निम्हण म्हणाले की, कामगारांना 8.33 टक्के बोनस, प्रोव्हिडंड फंड, मॅच्युरिटी, पेन्शन आदी फायदे मिळवून देणारे कायदे कॉंग्रेसने केले. मोदी सरकार मात्र कामगारांना मिळणारे कायदेशीर संरक्षण कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. कंत्राटी कामगार, भांडवलदार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत व्यवस्थापनाने अंगिकारलेली कामगार निती ही कामगारविरोधी असून कामगारांवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध मी संघर्ष करेन. असेही ते म्हणाले. दरम्यान, चाफेकर वस्ती, ओमसुपर मार्केट येथे काढलेल्या पदयात्रेला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनिकेत कपोते, संतोष लोंढे, हेमंत डाबी आदी उपस्थिता होते. खैरेवाडी येथे काढलेल्या पदयात्रेदरम्यानही विनायक निम्हण यांचे जंगी स्वागत करण्यात
आले. पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाली होते. यावेळी संजय बालवडकर, सुभाष परदेशी, भूषण आतिक, सूर्यकांत बिश्नोई, संजय मोरे, सचिन हांडे, राहुल वंजारी, अविनाश बेलवडे, महेश पवार आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी कामगार विरोधी ; भांडवलदार धार्जिणे -विनायक निम्हण
Date: