टंचाईबाबत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – अश्विन मुद्गल

Date:

सातारा(जिमाका) :जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी तसेच चारा याबाबत उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार ठेवावा. त्याचबरोबर उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करावी, अशा सूचना देताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकरी अश्विन मुद्गल यांनी दिला.
पालकमंत्री विजय शिवतारे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईबाबत होणाऱ्या बैठकीतील विषयांचा पूर्व आढावा जिल्हाधिकारी श्री.मुद्गल यांनी आज नियोजन भवनमध्ये घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, उप वनसंरक्षक अनिल अंजनकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश गणेशकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.
सुरुवातीला श्री.सोमण यांनी तालुकानिहाय उपाय योजनांबाबत आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.मुद्गल पुढे म्हणाले, तालुकनिहाय तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांनी कोणतीही कर्तव्यात कसूर न करता गावांमध्ये पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. यात प्रामुख्याने विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, नवीन विहिरींची कामे याला प्राधान्य द्यावे. 22-45 मध्ये विशेष दुरुस्ती योजना राबवावी. टंचाई कृती आराखडा तयार ठेवावा.पाण्याचा स्त्रोत दृष्टीकोनातून उपाययोजनांना सुरुवात करावी. केवळ नळ पाणीपुरवठा योजनेच्या नादुरुस्तीमुळे टँकर सुरु करणे, हे खपवून घेतले जाणार नाही. या कामात कसूर केल्यास गुन्हे दाखल केले जातील.
माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांचा सविस्तर आढावा घेऊन श्री.मुद्गल पुढे म्हणाले, उरमोडीचे पाणी माण मध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे निश्चितपणे तेथील टंचाईग्रस्त गावांमध्ये फरक पडेल. धोम बलकवडीचे पाणीही फलटण खंडाळयाकडे गेले पाहिजे. हे कालवे फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. आवश्यक त्या ठिकाणी 144 कलम जाहीर करा. पोलीस बंदोबस्त ठेवा. असे आदेश त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. धोम वगळता बाकीच्या धरणांमधील पाणी पातळी चांगली आहे. खटाव मधील पुसेसावळी प्रादेशिक पाणी योजना युध्दपातळीवर सुरु करावी. गावनिहाय नियंत्रण ठेवा. टँकर फिडींग पॉईंट सुस्थितीत ठेवून प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांचे कृती आराखडे तयार करावेत.
चारा टंचाईबाबतही आढावा घेऊन श्री.मुद्गल म्हणाले, चारा टंचाई होणार नाही याची खबरदारी आजपासूनच घ्या. ज्या तालुक्यांमध्ये उपलब्ध चारा आहे, तो संभाव्य टंचाईग्रस्त भागंामध्ये पाठविण्याबाबतही नियोजन करा. यावेळी सर्वच तालुक्यांमध्ये पुरेसा चारा उपलब्ध असल्याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकिला जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

11988508_1606012672993348_2949102868481036690_n

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र…

पुणे-मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी...

छत्रपती राजाराम महाराज सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

पुणे-शिवपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराजांच्या ३२५ व्या पुण्यतिथी निमित्त...

शिवनेरी, लेण्याद्रीसह चार ठिकाणी रोपवे प्रकल्प साकारणार…

पुणे- :- शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे...