Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘झी टॉकीज’ वर मराठी बॉक्स क्रिकेट लीगचे रंगतदार सामने

Date:

unnamed

मराठी मनाचा वेध घेणारी ‘झी टॉकीज’  वाहिनी नेहमीच मराठी प्रेक्षकांना अधिकाधीक नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आली आहे. मनोरंजन व खेळा चा असाच एक आगळा वेगळा धमाका ‘झी टॉकीज’  वाहिनीवर लवकरच पाहायला मिळणार आहे. यंदा पाचगणीत रंगलेल्या ‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वातल्या रंगतदार सामन्यांचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यांचे प्रक्षेपण झी टॉकीजवर येत्या २१ जून व २८ जून ला  सांयकाळी ७ वाजता होणार आहे.  यातला पहिला भाग २१ जून ला व दुसरा भाग २८ जून ला दाखवण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ पाचगणीत मोठ्या दिमाखात संपन्न झाली. सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दहा संघांमध्ये सामने खेळले गेले आणि यात बाजी मारली ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत सर्वच संघांनी एकमेकांना तोडीसतोड टक्कर दिली. विशेष म्हणजे अभिनेत्यांच्या बरोबरीने मराठी अभिनेत्रीनी देखील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मराठी मनोरंजन विश्वाने क्रिकेटच्या मैदानात ठोकलेल्या चौकार षट्कारांची आतषबाजी आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, स्मिता तांबे, माधव देवचक्के या व इतर कलाकारांचे नृत्याचे जलवे अशा मनोरंजनाच्या दुहेरी धमाक्याचं फूल टू पॅकेजचा आस्वाद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे.

‘झी टॉकीज’ वाहिनीच्या प्रत्येक नवीन गोष्टीला आतापर्यंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीला एकत्र आणणा-या महाराष्ट्र कलानिधी आयोजित मराठी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे रंगतदार सामने प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माळेगाव कारखाना:अजित पवार यांचाच दबदबा

पुणे/बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

अधिक माहिती घेतली असतामहिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या...

अकरावी प्रवेश: निवड यादी गुरुवारी

पुणे-इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित 'कॅप' फेरीतील निवड...

उद्या धनकवडीत पाणी पुरवठा बंद —

पुणे-आंबेगाव फाटा, धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे...