पुणे :
“बीव्हीजी इंडिया लि’ या कंपनीच्या “ब्रॅण्ड ऍबॅसिडर’ आणि प्रसिद्ध गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा यांच्यावरील पेन्ग्विन प्रकाशनाच्या “बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कृत्रिम पायाने सर्वोच्च शिखर “माऊंट एव्हरेस्ट’ सर करणारी पहिली महिला असा नावलौकीक असलेल्या अरूणिमा सिन्हा यांच्या गिर्यारोहणाच्या अनुभवाचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. हा प्रकाशन कार्यक्रम संसदेतील पंतप्रधान कार्यालय (दिल्ली) येथे झाला.
यावेळी बीव्हीजी इंडिया लि. कंपनीचे संस्थापक एच.आर.गायकवाड, ओमप्रकाश (अरूणिमा सिन्हा यांचे मेहुणे), विपीन वर्मा (बीव्हीजी इंडिया लि चे उत्तर भारत उपाध्यक्ष) उपस्थित होते. कंपनीचे संस्थापक एच.आर.गायकवाड यांनी “स्वच्छ भारत अभियान’ याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि स्वच्छता विषयक उपक्रमांची माहिती दिली.
“भारत विकास ग्रुप'(बीव्हीजी इंडिया लि.) ही कंपनी स्वच्छता, “हाऊस कीपिंग मेंटेनन्स’ या क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ अग्रेसर असून, कंपनीमध्ये 45 हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. संसद पंतप्रधानांचे निवासस्थान यासह देशातील अनेक सरकारी, निमसरकारी आणि कार्पोरेट जगतातील आस्थापनांची कामे “बीव्हीजी’ कडे आहेत.
अलिकडेच अरूणिमा यांनी आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर यशस्वीरित्या सर केले होते. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर जगातील सर्व महत्वपूर्ण शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार केला होता. यासाठी पुण्यातील “बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड’ कंपनीतर्फे त्यांना मदत देण्यात आली होती,
उत्तर प्रदेशात अरूणिमा सिन्हा यांना 2011 मध्ये रेल्वेतुन उतरताना ढकलले गेले आणि वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा पाय कापण्याची वेळ आली. मात्र डगमगून न जाता कृत्रिम पाय लावून एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार अरूणिमा सिन्हा यांनी केला आणि प्रत्यक्षात उतरवला.
गिर्यारोहक अरूणिमा सिन्हा यांच्या “बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन
Date: