श्रीगोंदे -गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी संपूर्ण राज्याला संशय आहे. प्रकाश शेंडगे यांनी याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली अन् त्यांचे तिकीट भाजपने कापले. दरवाजा सुरक्षित असताना मुंडे कसे काय, मृत्युमुखी पडले याबद्दल संभ्रम आहे. नितीन गडकरी यांच्यासह मुंडेंचा वाहनचालक व अपघात करणारा यांची नार्को चाचणी केली जावी. त्यातून काय घडले ते कळेल.”असे सांगत , माजी मंत्री. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे स्वबळावर सरकार आले, तर शरद पवारच पुन्हा मुख्यमंत्री होतील. असे संकेतले. “अबकी बार शरद पवार’ हाच राष्ट्रवादीचा नारा आहे, असे यांनी जाहीर सभेत सांगितले.
बेलवंडी (जि. नगर) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारसभेतते बोलत होते. माजी आमदार शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. भुजबळ म्हणाले, गुजरातमधून येऊन काही जण आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. महाराष्ट्राने गुजरातला सयाजीराव गायकवाड यांच्या रुपाने राजा दिला होता.भाजपमध्ये आज कोणाची चलती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोण आहेत. बहुजन समाज ९७ टक्के आहेत. मंत्रिमंडळात मराठा, माळी, वंजारी, धनगर का नाहीत. शेटजी भटजींचे राज्य आले आहे. आमदार बबनराव पाचपुतेंना लक्ष्य करताना भुजबळ म्हणाले, जे भाजपवाले पाचपुतेंना चोर – दरोडेखोर म्हणत हाेते. त्यांच्यात प्रवेश घेतल्यावर ते साधूसंत कसे झाले. अशा माणसांवर न बोलणेच बरे. या वेळी शिवाजीराव नागवडे, घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, अण्णासाहेब शेलार, उमेदवार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, विलास दिवटे, हरिदास शिर्के, बाळासाहेब गिरमकर, अनिल ठवाळ यांची भाषणे झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारािनमित्त व्यासपीठावर तालुक्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते एकत्र आल्याचे चित्र होते. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर हे देखील व्यासपीठावर होते. वीर व जगताप यांच्यातील वैर तालुक्यात सर्वश्रुत आहे.
भाजपचा मूळ चेहरा उघड : भाजप शेटजी, भटजींचा पक्ष अशी प्रतिमा गोपीनाथ मुंडेंनी पुसून टाकली. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपने मूळ चेहरा उघड करत ओबीसी नेत्यांची तिकिटे कापल्याचा आराेप भुजबळांनी केला.
गुजरातच्या पुढे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात येऊन पाहा, कळसुबाईच्या शिखरावर जाऊन पाहा महाराष्ट्राची उंची, छत्रपतींचे नाव घेऊन कुठे मत मागता, कधी जेजुरीला गेलात का, कधी रायगड पाहिले का? खमंग ढोकळा खाऊन हे दिसणार नाही, तर त्याला महाराष्ट्राची पुरणपोळी खाऊन पाहावे लागते, असे भुजबळ म्हणाले.
गडकरींची नार्को करा- गरजले भुजबळ
Date: