‘हद्द बघितलीस – आता जिद्द बघ’ अशी जबरदस्त कॅच लाईन असलेला आणि पोस्टरपासूनच स्वतः च वेगळ अस्तित्व सांगणारा ‘ कॅरीऑन मराठा ‘हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रासोबतकर्नाटकातील काही भागात प्रदर्शित होत आहे.
या सिनेमातून प्रथमच नायक म्हणून गश्मीर महाजनी हा मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. आकर्षक व पिळदार शरीरयष्टी, दमदार अभिनय, नृत्यामध्ये पारंगत असणारा हा अभिनेता, सिनेसृष्टीतील अतिशय नावाजलेला व देखणा अभिनेता रविंद्र महाजनीयांचा सुपुत्र आहे. एक जबरदस्तअक्शन ट्रीट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल. . कुशल – मोझेस यांनी चित्रपटाच्या नावाला साजेशाजबरदस्त अक्शन दिलेल्या आहेत. व गश्मीरने त्या अतिशय समर्थपणेपेलल्या आहेत. मराठी हिंदी चित्रपटातील नव्या जुन्या व दमदार कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याउंचीवर नेले आहे. या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणारी ‘कुसुम’ अर्थात कश्मीरा कुळकर्णी हिने कानडी मुलीची भूमिका साकारली आहे. यापूर्वी कश्मीराने दाक्षिणात्य चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहे. पण या चित्रपटातून तिच्या रूपानेही मराठीला एक नवा अभिनय संपन्न चेहरा लाभतो आहे असे म्हटले जाते . या चित्रपटाच्या प्रोमोने गाश्मीर आणि कश्मीरा या नव्या जोडी बद्दल मोठी अपेक्षा निर्माण होऊ पाहते आहे
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असतानाच त्याच पार्श्वभूमीवरमहाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नायक व नायिका यांच्या प्रेमकथेवरआधारित चित्रपटाची कथा आहे. दिग्दर्शक संजय लोंढे यांना सुचलेल्या कथेवर ऋषीकेश कोळी यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. याचित्रपटातील कानडी संवाद हे बेळगावातील सुप्रसिद्ध लेखक वनाटककार डॉ. डी. एस. चौघुले यांनी लिहिले आहेत.
या चित्रपटाला संगीतकार शैल- प्रीतेश या जोडीने संगीत दिले आहे. संगीतकार शैल-प्रीतेश यांनी अस्सल या मातीतले संगीत देऊन पुन्हाएकदा मराठी संगीताला चांगले दिवस येतील या आशा पल्लवीत केल्याआहेत. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी सिनेमासाठी गीते लिहिली असूनशैल आणि प्रीतेश यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भैसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजाचा स्वरसाज सिनेमाला चढला आहे. उर्मिला धनगर यांनीगायलेले एक गाणे तर संपूर्ण कानडी भाषेत आहे.
या चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे या चित्रपटाकरिताहिंदीतील प्रथितयश नृत्य दिग्दर्शक राजू खान, सुजीत कुमार,आदिलशेख, यांनी केलेलं नृत्यदिग्दर्शन. या चित्रपटातअरुण नलावडे, देविका दफ्तरदार, शंतनू मोघे, उषा नाईक, ओंकारकुळकर्णी, समीर खांडेकर, अमिन व करीम हाजी, अमेय कुंभार व कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांच्या भूमिकाआहेत. चित्रपटाच्याविषयाला अनुसरून या चित्रपटात बऱ्याच अंशी कानडी भाषेचा वापर केलेला आहे.
नंदा आर्ट्सच्या चंद्रभान ठाकूर व वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या शशिकला क्षीरसागर यानिर्मिती संस्थांनी एकत्रितरीत्या निर्मिती केलेला व संजय लोंढे यांनीदिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असून एखाद्या नवख्या क्रिकेटरनेपहिल्याच चेंडूवर सिक्सर मारावा असे काहीसे या चित्रपटाचे झालेआहे. पहिल्याच प्रयत्नात एक अतिशय देखणा दर्जेदार व मनोरंजकअसा हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे.