Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एकच ध्येय, शिवाजीनगरचा सर्वांगीण विकास- विनायक निम्हण

Date:

vn

पुणे-गेली 15 वर्षे शिवाजीनगर मतदारसंघाचा गतीमान विकास हेच ध्येय ठेऊन मी काम केले. विनायक निम्हण यांनी मतदारसंघातील पायाभूत नागरी सुविधांमध्ये भर पडावी, यासाठी आमदार निधी आणि विशेष निधीचा 100 टक्के वापर केला. गरीबातील गरीब माणसाचे जीवनमान उंचवावे, रस्ते, पाणी, वाहतूक, कचरा निर्मूलन, आरोग्य, शिक्षण याबरोबरच रोजगार, पर्याारण संवर्धन, व्यायमशाळांचा प्रसार, महिलांचे आर्थिक सुबत्तीकरण आदी प्रत्येक बाबतीतच कामे करून विकासकामांना गती दिली. दूरदृष्टी आणि जिद्द या जोडीला नागरीकांचा विश्‍वास राहिल्याने मी हा विकास साधू शकलो. विकास ही कायमची प्रकि‘या असून विकासाची ही गती राखण्यासाठी या निवडणुकीत आपण मला पुन्हा विजयी करावे, असे आवाहन शिवाजीनगर मतदारसंघातील काँग‘ेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी आज पदयात्रेच्या समाप्तीप्रसंगी नागरीकांना केले.
विनायक निम्हण रविवारी सकाळी वडारवाडी परिसरात पदयात्रा काढून मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मत कोणाला-काम करणार्‍याला’ अशा घोषणांनी सारे वातावरण दुमदुमून गेले.. यावेळी नगरसेवक मुकारी अलगुडे, माजी मंत्री सुरेश नवले, युवक काँग‘ेसचे धहराध्यक्ष कैलास पवार, रामदास पवार, औज धोत्रे, दत्तू कुसाळकर, सदानंद जोशी, बी.टी. देवकर, शिवाजी जाधव, विष्णू जाधव, शिवराम पवार, विनोद मंजाळकर, बंटी वडार, राकेश विटकर, अनिल अलगुडे, रिझवान शेख आदी उपस्थित होते. निम्हण म्हणाले, शिवाजीनगर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या जागरुक मतदारसंघ असून येथील नागरीकांनी गेली 15 वर्षे कामावर विश्‍वास दाखविला, , यामतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा अहवाल मी घरोघर
पोहोच केला आहे. अजून खूप कामे पुढील पाच वर्षात मार्गी लावायची असून राज्य व केंद्र सरकारचा वाढीव निधी या विकासकामांसाठी मी आणेल, असे ते म्हणाले. या जोडीलाच पुणे शहराच्या विकासातील मुबलक पाणीपुरवठा, मेट्रो
प्रकल्प, रेल्वेचे हडपसर टर्मिनल, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढत्या रोजगारासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन अशा कामांसाठीदेखील या शहरातील आमदार म्हणून मी पाठपुरावा करीत राहील, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहर ग्लोबल सिटी बनत असताना पुण्याचे पुणेरीपण हरवू नये, यावर माझा भर असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, यावर माझा आधीप्रमाणेच भर राहणार आहे. मतदारसंघात केलेल्या विकास कामांबद्दल माहिती देताना ते म्हणाले, की पुण्यातील पहिला उड्डाणपूल विद्यापीठ चौकात झाला, पहिला ग‘ेडसेपरेटरही माझ्याच मतदारसंघात झाला. पुणे महापालिकेचे अनेक विकासप्रकल्प मार्गी लागण्यासाठी व राज्य शासनाच्या योजनांची अमलबजावणी होण्यासाठी मी सातत्याने काम करीत राहिलो. पाण्याचा थेंब न
थेंब वाचावा यासाठी ‘पाणी बचाओ’ आंदोलन तर केलेच, शिवाय नादुरुस्त गळके हजारो नळ स्वखर्चाने दुरुस्त केले.
व्यायाम, खेळाची मला आवड असून माझ्या आमदारनिधीतून 75 हून व्यायामशाळांना तसेच पोलिसांच्याही व्यायामशाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला, हॉकीची पंढरी समजल्या जाणार्‍या खडकीमध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदान उभारले, तसेच पदके मिळवणार्‍या खेळाडूंना दीड कोटींची रक्कम राज्य शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी आग‘ही राहिलो, असे सांगून निम्हण म्हणाले की, पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ‘ुण हत्या विरोधी जागरण आणि सायकलचा वापर वाढावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मिर असा सायकल प्रवास तीन टप्प्यात केला. दरवर्षी कि‘केट, कॅरम अशा क‘ीडास्पर्धांचे आयोजन, वस्त्यांतील तरुणांनादेखील खेळासाठी मैदान मिळवून देणे अशी अनेक कामे माझी वर्षानुवर्षे चालूच राहिली, असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खुनातील आरोपी उद्धव उर्फ उद्ध्या कांबळेला सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे – २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या...

ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा :उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १५ जुलै २०२५ : ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा...