पुणे : “बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ अभियांत्रिकीची पदवी पुरेशी नाही. पदवीसोबतच विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य आत्मसात करणे ही आजची गरज आहे. कारण उद्योगक्षेत्राकडून कुशल मनुष्यबळाची मागणी केली जात आहे,” असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या (एनआयसीएमएआर) ‘प्ले
वाघोली येथील जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे ‘बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर आयोजित एक दिवसाच्या सेमिनारमध्ये डॉ. लेले बोलत होते. याप्रसंगी ‘एनआयसीएमएआर’चे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत गोखले, डॉ. जोनार्दन कोनेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, विभागप्रमुख प्रा. एस. जी. बन, प्रा. एस. व्ही. जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. चंद्रकांत गोखले म्हणाले, “पायाभूत सुविधा उभारणीचे काम जोमाने चालू आहे. बांधकाम क्षेत्रालाही चांगले दिवस येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित विषयात आपली निपुणता असली पाहिजे.” डॉ. जोनार्दन कोनेर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. एन. यू. कोरडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. एस. शिंदे यांनी संयोजन केले व आभार मानले.