पुणे -महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने तळेगाव, सुद्रुंबे येथील नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स या प्रशिक्षण संस्थेत प्रसार माध्यम प्रतिनिधींकरिता ‘‘आपत्कालीन प्रसंगी प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी एनडीआरएफ चे कमांडंट आलोक अवस्थी यांनी एनडीआरएफच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन प्रसंगी एनडीआरएफने केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवांविषयी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपत्कालीन घटनांविषयी माहिती सांगितली.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेटराजेंद्र जगताप) यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापना संदर्भात करावयात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती सांगितली.
विविध आपत्कालीन प्रसंगी कशाप्रकारे उपाय योजना कराव्यात, कोणती काळजी घ्यावी, काय करावे, काय करु नये या संदर्भात प्रसारमाध्यमांची भूमिका कोणती राहील या संदर्भात डेप्युटी कमांडंट पंडित इथापे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र इमर्जन्सी सव्र्हिसेसच्या वतीने डॉ. राजेंद्र जगताप यांनी आपत्कालीन प्रसंगी घडणाèया घटना तसेच श्वसनक्रिया बंद होणे, हृदयविकाराच्या घटना अशा प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाय योजना संदर्भात तसेच महाराष्ट्र इमर्जन्सी सेवे अंतर्गत मोफत सेवेच्या आपत्कालीन अॅम्ब्युलन्स १०८ विषयी सविस्तर माहिती सांगितली.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी श्री. गणेश सोनुने यांनी केले.