राळेगणसिद्धी- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांना साथ दिली नाही ,केजरीवाल यांना बहुमत मिळाले नाही तेव्हा अण्णांनी मी केजरीवाल बरोबर त्याच्या प्रचारासाठी जायला हवे होते असे विधान केले होते , मात्र आता याखेपेलाही अण्णा निवडणुकीच्या राजकारणापासून दूरच राहत असून , आपच्या केजारीवालांना आशीर्वाद द्यायला तयार नसल्याचे दिसते आहे , अण्णांचा आशीर्वाद मिळेल अशी आशा केजरीवाल व्यक्त करत असतानाच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बेदींना फोडून आप ला मोठ्ठे आवाहन दिले आहे या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी आपली संपूर्णतः भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन करण्यात येणार असून, किरण बेदी यांच्या भाजपप्रवेशाविषयी आपणास काहीही बोलायचे नाही. मी राजकारणापासून दूर असल्याचे आहे.
जनलोकपाल आंदोलनात सहभागी झालेल्या बेदी यांनी थेट भाजपत प्रवेश केला असून, त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. याविषयी पत्रकारांनी हजारे यांना छेडले असता ते म्हणाले, की बेदी यांच्या राजकारणप्रवेशाविषयी मला काहीही भाष्य करायचे नाही. भाजपप्रवेशापूर्वी त्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
अण्णा हजारे पुन्हा तटस्थ ? दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर जनलोकपालसाठी आंदोलन करणार।
Date: