राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्यकारणीची झूम बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित संपन्न

Date:

पुणे-कलावंताच्या हक्क व न्यायासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांच्या पुढाकारातून संचारबंदी च्या काळात कलावंतांना आर्थिक व मानसिक सहकार्य करण्याच्या हेतूने प्रदेश अध्यक्ष बाबा पाटील यांच्या पुढाकारातून आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झूम मिटिंग संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ कलावंत विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे,सविता मालपेकर, गिरीश परदेशी, सुधीर निकम, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत मानकर, मच्छिंद्र धुमाळ, मेघा घाडगे,असित रेडिज वैभव लामतुरे, संतोष भांगरे उपस्थित होते सर्व प्रथम प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी संचार बंदीच्या काळात कलावंतांनाचा का बंधने घातली जातात या कडे सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले ,त्यावर सुळे यांनी सुद्धा लवकरच कला प्रकारावरील निर्बंध हटवण्याची ग्वाही दिली तर विजय पाटकर (प्रदेश उपाध्यक्ष) यांनी लॉक डाऊन च्या काळात सर्व स्थरातील कलाकारांना कमी युनिट मध्ये कोविड चे नियम पाळत शुटिंग ला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली तसेच प्रिया बेर्डे (अध्यक्ष पुणे जिल्हा) मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्री दर्जा लवकरात लवकर द्यावा -अशी मागणी केली.
सांस्कृतिक विभागाच्या संदर्भातील सर्व निर्णय , मिटिंग , समित्यावरील नियुक्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्यकारणीला सहभागी करून घ्यावे -अशी विनंती डॉ.सुधीर निकम (अध्यक्ष मराठवाडा विभाग) यांनी केली.लॉकडाऊन लावायचा विचार शासन जेव्हा करतो त्यावेळेस पहिल्यांदा नाटक बंद , शूटिंग बंद अस का ? कोरोना हा फक्त कलाकारांमुळेच होतो का ? – असा प्रश्न सविता मलपेकर (प्रदेश सरचिटणीस ) यांनी विचारला.सर्व इंडस्ट्री , उद्योग धंदे , आयटी कंपनीला नियम पाळून चालू करण्याची परवानगी आहे तर मग शूटिंग ला नियम पाळून परवानगी का नाही -अशी मागणी मछिंद्र धुमाळ (प्रदेश संघटक ) केली.तर विदर्भातली सर्वात मोठी असलेल्या झाडीपट्टी कलावंतांसाठी आर्थिक पॅकेज सोबतच त्यांच्या रोजगाराचे प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमात शासनाच्या वतीने त्यांना समाविष्ट करून घेण्याची मागणी प्रशांत मानकर यांनी केली. कलावंतांना ठाणे येथील गडकरी रंगायतन हे नाट्य गृह येथे 25% भाडेपट्टीवर वर्षभरासाठी भाड्याने देण्याची मागणी मेघा घाडगे यांनी केली. कलावंतांना आर्थिक प्रगती सोबतच सन्मानानं वागणुकीची व त्यांना शासकीय जाहिरातीत समावून घेण्याची विनंती अशीत रेडजी यांनी केली. कलावंत विविध आर्थिक अडचणीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक फी पासून तर घराचा हप्ता भारे पर्यंतच्या अनेक अडचणी कलावंताचा समोर उभ्या असल्याने त्वरित रोजगार प्राप्त झाला पाहिजे अशी मागणी गिरीश परदेशी यांनी केली. सर्व कलावंत यांच्या भावना समजून घेऊन सुप्रिया सुळे यांनी ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिलेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांचे सुद्धा यानिमित्त कौतुक केले बाबा पाटील यांनी कलावंताच्या हक्कासाठी पूर्ण महाराष्ट्रात एक मोठी कलावंतची फळी निर्माण केली असून कलावंतांच्या हक्कसाठी दिवस-रात्र झटणारा नेता म्हणून त्यांचा गौरव केला.या वेळी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...