‘साजणा’ मालिकेच्या शीर्षक गीताची प्रेक्षकांच्या मनावर भुरळ!!!

Date:

‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. या संकल्पना प्रेक्षकांना पसंत पडतात आणि मालिका लोकप्रिय होतात. अशीच आणखी एक प्रेमकहाणी ‘झी युवा’ घेऊन येत आहे. ‘साजणा’ असं या नव्या मालिकेचं नाव असून, त्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. मालिकेचा टीजर आणि शीर्षकगीत यांनी प्रेक्षकांच्या मनावर आतापासूनच भुरळ घालायला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेले हे गीत, किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांनी लिहिलेले आहे. अभिजित-विश्वजित या प्रसिद्ध जोडीने हे अप्रतिम गीत, संगीतबद्ध केले आहे. सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आलेल्या असल्याने, हे गीत प्रेक्षकांना खूपच पसंत पडते आहे. शीर्षकगीत आवडू लागल्याने, प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीदेखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

१५ एप्रिलपासून ‘साजणा’ ही नवी मालिका, झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र व मुख्य अभिनेत्री पूजा बिरारी अशी नवीकोरी जोडी यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका गावात या मालिकेचे कथानक घडताना पाहायला मिळेल. पहिलाच टीजर प्रेक्षकांना पसंत पडल्याने, या नव्या कथानकाविषयी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. एका श्रीमंत घरातील मुलगा आणि एका गरीब घरातील मुलगी यांची ही प्रेमकथा आहे. शीर्षकगीताप्रमाणेच मालिकादेखील लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल अशी खात्री आहे.

या शीर्षक गीताविषयी बोलताना, गायक स्वप्नील बांदोडकर म्हणतात;

“एक अत्यंत सहजसुंदर असं हे गीत, लगेचच मनाला भावतं. हे नितांतसुंदर गीत प्रेक्षकांना सतत ऐकत राहावंसं वाटेल याची मला खात्री वाटते. शीर्षकगीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं ‘झी युवा’कडून मला सांगण्यात आलं. म्हणूनच, प्रेक्षकांच्या अभिप्रायाचीदेखील मला खूप उत्सुकता आहे. गीत आपलंसं वाटत असल्याने, मालिका प्रदर्शित होण्याची उत्सुकता माझ्याही मनात आहे.”

‘साजणा’ ही नवी मालिका, ‘झी युवा’ वाहिनीवर सोमवार १५ एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...