ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा विरोधकांना इशारा

Date:

मुंबई-विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी ‘आमचा जर कोणी नाद केला तर सोडणार नाही. आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु. मात्र आम्हाला कोणी पाय लावण्याचा प्रयत्न केला, अंगावर आले तर शिंगावर घेऊ. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, अशी प्रतिक्रीया शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. आमदार एकमेकांच्या अंगावर धावून आले. शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली आहे.ते म्हणाले, गेली 3-4 दिवस आघाडीतले तिन्ही पक्षाचे नेते गद्दार, खोके अशाप्रकारे ओरडत होते. जे आम्ही केलेले नाही ते आमच्या माथ्यावरती मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवले की वस्तुस्थिती समोर आणावी. आणि त्याचमुळे आम्ही हे आंदोलन केले. ते जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा आम्ही आलो नाही. मग आमच्यावेळी ते का आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.पुढे ते म्हणाले, आता आम्ही आंदोलन केले तर ते त्यांना का मिर्च्या झोंबल्या? त्यांचे सगळे घोटाळे बाहेर काढले. कोरोनात झालेला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा, अनिल देशमुखांपासून, नवाब मलिक, सचिन वझे, परब सर्वांचे घोटाळे बाहेर काढले. आमचे आंदोलन पूर्ण झाल्यावर त्यांनी यायला हवे होते. त्यांनी सगळ्यांचे लक्ष विचलित केले, हा कुठला प्रकार?आम्ही 10 वाजेपासून इथे होतो. 50 खोके आम्ही घेतलेले नाही. आमच्या मार्गाला ते आडवे का आले. आम्ही पहिले याठिकाणी आलो. रोज खोके खोके नाचवताय म्हटलं एकदाचे ओके करुन टाकू. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असुन डरपोक नाही. असाही इशारा त्यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे-शशिकांत कांबळे यांची मागणी; 

 पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये...