नवख्या आमदारांनी शिवीगाळ करून हाथापाई केल्याचा अमोल मिटकरी यांचा आरोप ,त्यांनी केला शक्ती आणि मस्ती प्रदर्शनाचा प्रयत्न- -.-पण आम्ही गांधींच्या विचाराचे …मुख्यमंत्री शिंदेना सांगितले ,तुमच्या आमदारांना आवरा,शिवीगाळ करताहेत ,त्यांना २ हाथ आहेतआम्हालाही २ हाथ आहेत,.पण आम्ही गांधींच्या विचाराचे …शरद पवारांच्या शिकवणुकीत ले आहोत
मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमीका मांडणार होतो. परंतू विधी मंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधाऱ्यांच्या आमदाराकडून विरोध केला गेला आहे. आम्ही आंदोलन करून घोषणाबाजी करीत होतो. तेव्हा शिंदे गटातील आमदारांनी मला आम्हाला शिवीगाळ करून धक्काबुकी देखील केली आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे. एका अर्थाने विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमच्या घोषणा यांना जिव्हारी लागल्याने हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या इतिहासात हा लाजीरवाणा प्रकार आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. अशा आमदारांवर कारवाई केली जावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
एका दृष्टीक्षेपात मिटकरींची पत्रकारपरिषद
- पन्नास खोके आणि एकदम ओक्के असा वाक्य प्रचार प्रसिद्ध झाला आहे.
- अप्रत्यक्ष रित्या माय-बहिणीवर आम्हाला शिव्या दिल्या आहेत.
- या सभागृहाची प्रतिमा मलिन करायची नाही. आम्हाचा तसा विचार देखील नाही.
- याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
- तुमच्या गटातील आमदारांनी आम्हाला शिवीगाळ केली. धक्काबुकी केली. एवढे करून देखील ते या ठिकाणी येवून पुन्हा अंगावर येसाल तर शिंगावर घेऊ, अशी भाषा वापरत आहे. ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्टी आहे.
- याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ती कारवाई करतील असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.