गरज नसतानाही रुंदीकरण का ?सहकार नगर,संभाजीनगर,पर्वती येथील रहीवाश्यांचा महापालिकेला सवाल

Date:

पुणे : सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याच्या निर्णयानंतर रहीवाश्यांना नाेटीसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. संभाजीनगर,सहकारनगर, पर्वती भागातील नागरीकांनी यास तीव्र विराेध दर्शविला आहे. त्याकडे लक्षवेधण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताशा वाजवित महापािलका प्रशासनाला निवेदन सादर केले. आमच्याकडे गरज नसताना, रुंदीकरण का ? असा सवाल या रहीवाश्यांनी केला आहे.

महापािलकेतील विराेधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या उपस्थितीत नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. तत्पुर्वी महापािलकेच्या आवारातील महात्मा ज्याेतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी हे ताशा वाजवित इमारतीत घुसले. त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नगरसेविका अश्विनी कदम यांनी सुरक्षारक्षकांना आम्हाला जाऊ द्या असे बजावित, वाघमारे यांचे कार्यालय गाठले. याप्रकरणी सुनावणी घेऊन याेग्य ताे निर्णय घेतला जाईल असे आश्वासन वाघमारे यांनी उपस्थितांना दिले.
नुकतेच स्थायी समितीने शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या निर्णयाला विराेध वाढू लागला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापािलका प्रशासनाने नाेटीस बजाविण्यास सुरवात केल्यानंतर रहीवाश्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या रहीवाश्यांना त्यांची जागा जाणार, घराबवर बुलडाेझर फिरविला जाणार याची चिंता सतावू लागली आहे. यातूनच सहकारनगर भागातील नगरसेिवका अश्विनी कदम यांनी सुमारे पावणे सहाशे रहीवाश्यांच्या हरकती महापािलका प्रशासनाला सादर केल्या आहेत. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,पर्वती अध्यक्ष नितीन कदम, नगरसेविका प्रिया गदादे,दिलीप अरूंदेकर, अण्णा तळेकर,अनिल सातपुते, तुषार नांदे,सुशांत ढमढेरे,प्रेम गदादे, समीर पवार,डॉ.सुनिता मोरे, दिनेश खराडे, पराग थोपटे,दिगंबर कोबल,अभिजीत उंद्रे ,संग्राम वाडकर, सचिन जमदाडे, संजय दामोदरे, आदित्य उढाने, वीरेन जेधे,साईल चिकणे, तेजस मिसाळ आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

‘‘ जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी रुंदीकरण का केले जाते ? ठराविक बांधकाम व्यावसाियकांचे हीत जपण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरावर बुलडाेझर फिरविणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत’’ -:नगरसेविका अश्विनी कदम

‘‘ सध्या काेराेनाच्या परिस्थितीमुळे अनेकांचे राेजगार गेलेत. काेराेनातून सावरत असतानाच याप्रकारे काेणाचातरी स्वार्थ साधण्यासाठी नाेटीस पाठवून नागरीकांच्या चिंतेत वाढ करू नका ’’ विराेधी पक्षनेत्या – दिपाली धुमाळ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

६० कोटी जास्त दर दिलेल्या अशोक लेलॅंडला PMPML च्या 1 हजार बसची ऑर्डर ?

पुणे- सध्या PMPML विविध मार्गाने प्रसिद्धी झोतात आहे. बेकायदा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासन आग्रही

भूखंडाचा वाणिज्य झोन PSP करण्यासाठी राज्य सरकार कडे...