मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याचे राजकारणच यातून दिसून आले आहे कि मुद्दामहून दर्शविले आहे यावर आता मंथन होते आहे. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.