प्रविण दरेकर वीकेंड लॉकडाउनवर काय म्हणाले …(व्हिडीओ)

Date:

मुंबई- राज्यातील लॉकडाऊन बाबत ठाकरे सरकारने मध्यममार्ग काढून निर्णय घेतल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले आहे.

प्रविण दरेकर ऑन वीकेंड लॉकडाउन

• पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा मध्यममार्ग राज्यसरकारने काढलेला आहे. • अतिशय उत्तम असा निर्णय आहे. • लॉकडाऊन करू नये अशी भावना केवळ भाजप, महाविकास आघाडी सरकारची नव्हती तर सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन परवडणार नाही अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षीय लोकांची होती. • दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाऊन अशा प्रकारचा मध्यममार्ग निश्चितपणे उत्तम आहे. • जनतेची काळजी आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये सक्षमपणा करण्याची आवश्यकता राज्यसरकारला आहे. • जे विसंवादाचे विषय आहेत ज्यामुळे खालच्या स्तरावरील लोकांवर अन्याय होतो त्याची काळजी घेणं सरकारला आवश्यकता आहे. • लॉकडाउन पूर्ण झाला असता तर, सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली असती. • कोरोनाच्या काळात विरोधकांची भूमिका न घेता एकत्रित या विषयवार मत मांडलं पाहिजे. • महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था कोलमडली असून, राज्यसरकार आरोग्य यंत्रणा वाढवली असल्याचे सांगत असले तरी कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटरची कमतरता आजही भासत आहे. • वेळेत ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटर मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे. • वस्तुस्थितीला सामोरं जात व्यवस्था सशक्त करण्याची आवश्यकता आहे. • रुग्णांची परिस्थिति बघता १० हजार रुग्णांना पुरेल एव्हढी सुद्धा आरोग्य व्यवस्था उपलब्ध नाही आहे. • या सर्व गोष्टी गांभीर्याने घेत सर्व गोष्टी तात्काळ नियोजनात आणावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या शिबिराचा राहुल गांधींच्या उपस्थितीत समारोप.

राहुल गांधींनी घेतली जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबियांशी भेट, आदिवासी विद्यार्थ्यांशीही साधला...

दीप्ती चवधरी यांच्या कार्यअहवालाचे राहुल गांधी यांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते ...

हडपसरमध्ये महापालिकेच्या कचरा डंपरची धडक; तरुणाचा मृत्यू

मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची मदत द्या; प्रमोद नाना...