आमची गद्दारी नाही तर क्रांती आहे, अन्यायाविरोधातील उठाव आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

Date:

पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत

नवी दिल्ली- आम्ही गद्दारी केली हा आरोप चुकीचा आहे , आम्ही क्रांती केलीय , अन्यायाविरुद्ध उठाव केलाय असे स्पष्टीकरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीती पत्रकार परिषदेतही दिले , ते म्हणाले ,राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितलं आहे. सध्या पावसाळा आहे, अडचणी निर्माण होऊ शकतात, पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यावर आयोगाशी चर्चा करणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.शिंदे गट आणि भाजपा युतीचं सरकार बेकायदेशीरपणे सत्तेत आलं असल्याचा दावा करत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना आम्ही सगळं नियम आणि कायदे पाळूनच केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आम्ही शिवसेना आहोत. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमच्या गटाला मान्यता दिली आहे. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही”, असं ते म्हणाले.

या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांच्या भेटी घेतल्या, यानंतर माध्यमांशी संवाद साधला, यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आम्ही दोघं उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देऊ असे त्यांनी सांगितलं. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे यांनी सांगितले की, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने ते मागे-पुढे होऊ शकते. पण या अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.पुढे बोलताना शिंदे यांनी सांगितलं की, शिवसेना-भाजप युतीचं सरकार जे अडीच वर्षींपूर्वी झालं पाहीजे होतं ते आम्ही स्थापन केलं आहे, चाळीस अधिक दहा हे ५० आमदार तीन-चार लाख लोकातून निवडून आलेले आमदार आहेत, ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक देखील एकडे तीकडे जायला दहा वेळा विचार करतो, या आमदारांना मागच्या अडिच वर्षात त्यांना अनुभव आला आहे. मुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. हे आमचं हे बंड नाही, ही गद्दारी म्हणतायत ही गद्दारी नाही, ही क्रांती आहे, अन्यायाविरोधातील उठाव आहे, हे पैशांने विकले जाणारे नाहीयेत .ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रकरण सध्या कोर्टात आहे. यावर निर्णय येणे बाकी आहे पण आरक्षणावर निर्णय झाल्यावर निवडणुका घ्याव्यात अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. सगळी कडे पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला बोलणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
हे सरकार किती दिवस टिकेल असे विचारले असता, हे सरकार अडीच वर्ष पुर्ण करेलच एवढी कामे आम्ही करू, बाकी लोकांसारखे २५ वर्ष वगैरे सांगत नाही. पण पुढची निवडणूक पण जिंकू आणि २०० आमदार निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...