एकनाथ शिंदे आणि फडणविसांच्या कामगिरीवर दिल्लीश्वर खुश

Date:

 

नवी दिल्ली- – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘’६-अ’’ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी शिंदे आणि फडणवीस यांनी सुमारे सहा तास चर्चा केली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्रीनंतर अडीच वाजता संपली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील कायदेशीर गुंतागुंत या दोन मुद्द्यांवर प्रामुख्याने खलबते झाल्याचे समजते. त्यामुळे खातेवाटप कधी हाच प्रश्न विचारला जात असून मोदींच्या भेटीआधी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

अकरा जुलै ची कोर्टातील तारीख , कोर्टातील सरकारबाबत शिवसेनेच्या याचिका यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणे आहे त्यामुळे बरेच काही कोर्टाच्या निर्णयानंतर काय करायचे हेच ठरल्याचे समजते .राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर शिंदे व फडणवीस भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहेत. शहा आणि नड्डा यांच्या भेटींमुळे राज्यातील शिंदेंच्या सरकारवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. नड्डा यांच्याशी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती मजबूत करणे यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. नड्डा यांच्या व्यतिरिक्त शिंदे व फडणवीस केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेटघेतली असून त्यानंतर दिल्ली दौऱ्यातील शेवटची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असेल.असे सांगण्यात येते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...

तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई

पुणे -पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन...