वायरलेस जॅमरची बेकायदेशीर सुविधा आणि विक्रीबाबत ई- वाणिज्य कंपन्यांना इशारा

Date:

नवी दिल्ली, 4 जुलै 2022

वायरलेस जॅमर आणि बूस्टर/रिपीटर्सच्या योग्य वापराबाबत सामान्य जनतेसाठी, दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने 1 जुलै, 2022 रोजी मार्गदर्शक सूचना (https://dot.gov.in/spectrummanagement/advisory-proper-use-wireless-jammer-and-boosterrepeater). जारी केल्या आहेत.

भारत सरकारने दिलेल्या विशेष  परवानगीशिवाय  सेल्युलर सिग्नल जॅमर, जीपीएस ब्लॉकर किंवा इतर सिग्नल जॅमिंग उपकरणांचा  वापर सामान्यत: बेकायदेशीर आहे, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.  या संदर्भातील तपशीलवार मार्गदर्शक सूचना https://cabsec.gov.in/others/jammerpolicy/ येथे उपलब्ध आहेत.खाजगी क्षेत्रातील संस्था आणि/किंवा खाजगी व्यक्ती भारतात जॅमर खरेदी/वापरू शकत नाहीत.

वर नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांननुसार परवानगी घेतल्याशिवाय , भारतात सिग्नल जॅमिंग उपकरणांची जाहिरात करणे, विक्री करणे, वितरण करणे, आयात करणे किंवा अन्य  प्रकारे विपणन करणे   बेकायदेशीर आहे,  असेही नमूद केले आहे.

सिग्नल बूस्टर/रिपीटरच्या संदर्भात असे नमूद केले आहे की, परवानाधारक दूरसंचार सेवा प्रदात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती/संस्थेद्वारे मोबाईल सिग्नल रिपीटर/बूस्टर ठेवणे, विक्री करणे आणि/किंवा वापरणे बेकायदेशीर आहे.

तत्पूर्वी, 21 जानेवारी, 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनेद्वारे (https://dot.gov.in/spectrummanagement/notice-e-commerce-companies-regard-illegal-facilitation-sale-signal-jammers), ऑनलाइन मंचावर वायरलेस जॅमरची विक्री किंवा विक्री सुविधा प्रदान करण्यासंदर्भात ई – वाणिज्य कंपन्यांना दूरसंचार विभागाने इशारा दिला आहे. उपरोक्त सूचनेची एक प्रत वाणिज्य मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ,सीबीआयसी / सीमाशुल्क यांना देखील योग्य कार्यवाहीसाठी  वितरित करण्यात आली आहे.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...

पुणे महानगर क्षेत्राला ‘पीडीआरएफ’ व अग्निशमन दलाच्या सुरक्षेचे अभेद्य कवच!

तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव; १८९ बचावकार्ये...