पुणे:
रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कोरोनाकाळातसुद्धा देवदूताची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांचा ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’च्या वतीने सन्मान करण्यात आला. गुरुवारी ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने कोथरुड परिसरातील दहा डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला गेला, अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली.
‘कोरोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर्स देवदूतच आहेत. त्यांच्या कौशल्याने आणि ज्ञानाने अनेकांना जीवनदान मिळाले. कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा सन्मान केला गेला.
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून अशा दहा कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टर करत असलेल्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा आपण यशस्वीपणे लढत आहोत, त्यांच्या या सेवेला सलाम!’, असे गिरीश गुरनानी म्हणाले.
कोथरूड परिसरातील डॉ. सुरेश बोरकर, डॉ.अशोक सोहोनी, डॉ.मिताली कुलकर्णी, डॉ.समीर नारकर, डॉ. विजय तरटे, डॉ.संध्या कोथवाड, डॉ. एस.एम.भाटे, डॉ. सुहास नेने, डॉ. मुकुंद कर्वे, डॉ. मीना पाटील या डॉक्टरांचा सन्मान केला. सन्मानचिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप होते.
यावेळी ऋषिकेश कडू, अमोल गायकवाड, राहुल जमदाडे, रवी गाडे, संदेश कोतकर, निलेश बचेवार, प्रकाश नागरे, धनंजय शेळके, पंकज नागरे उपस्थित होते.