पंधरावा ‘बसंत उत्सव’ संपन्न

Date:

नृत्य आणि गायनाने वातावरण संगीतमय
पुणे : बांगीया संस्कृती संसद’ च्या वतीने ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०२०’ साजरा झाला. प्रचंड उत्साहपूर्ण, सकारात्मक भावना जागृत करणारा असा सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध हा ‘बसंत उत्सव’ रविवारी ‘एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन’ येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे पंधरावे वर्ष होते.

वसंत ऋतूतील रम्य सकाळच्या छटांचे विविध पैलू नृत्याद्वारे उलगडण्यात आले. रवींद्र संगीतातून सुंदर गीतांची संगीत आणि नृत्य यांच्याशी सांगड घालून वसंत ऋतूचे दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले.

‘फागून दिनेर रबी’ या कार्यक्रमात पुण्यातील विविध भागातून शंभराहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. विविध गट आणि सांस्कृतिक समुदाय यांचे एकत्री सादरीकरणाचे हा कार्यक्रम उत्तम उदाहरण होता. रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनांमधील  निवडक दहा गाणी नृत्याद्वारे सादर करण्यात आली. यावेळी वातावरण संगीतमय झाले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका रवींद्रसंगीत कलाकार आदिती मोहसिन (बांग्लादेश) यांचे सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. एम्प्रेस गार्डनच्या निसर्गरम्य आणि खुल्या आकाशात झालेल्या कार्यक्रमातील नृत्य आणि गायनाच्या सादरीकरणाने वातावरण वसंत ऋतूमय झाले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे बांग्लादेशचे कलाकार सुरेश पिंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संगीतकार, गायक व अभिनेते पद्मश्री शेखर सेन, गायक शुर्जो भट्टाचार्य, गायिका सुप्रतिक दास, आदिती मोहोसीन, ‘बांगीया संस्कृती संसद’ व ‘बसंत उत्सव’ समितीच्या अध्यक्षा सुजाता पॉल, सांस्कृतिक प्रमुख मधुमिता घोष, बिरेस्वर मित्र, अरुण चट्टोपाध्याय, सुभासीस बागल, शिवाजी मुखर्जी, डॉ. पुलक गुहाथूरता, ‘बांगीया संस्कृती संसद’ कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते.
‘पुण्यातील जुनी सामाजिक-सांस्कृतिक संस्था ‘बांगिया संस्कृती संसद’ ही 2006 पासून हा कार्यक्रम आयोजित करत आहे. संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगाली संस्कृती आणि साहित्याचा प्रसार केला जातो’, अशी माहिती ‘बसंत उत्सव’ समितीच्या अध्यक्षा सुजाता पॉल यांनी दिली.
‘बसंत उत्सव’ पुण्यातील विविध सांस्कृतिक समुदाय आणि सांस्कृतिक एकत्रीकरण यामधील दुवा आहे. पुण्यातील अनेक कलावंत या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम शांतीनिकेतन बसंत उत्सवाच्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देतो’, अशी माहिती ‘बांगीया संस्कृती संसद’ च्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मधुमिता घोष यांनी दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांना रुपाली पाटलांनी घातले साकडे

पुणे-राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला...

‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव पुणे : साडेतीन...