‘शिक्षकांनी विद्यार्थ्यात जिज्ञासा निर्माण करावी :डॉ के एच संचेती
पुणे :
‘ एक संस्कारित पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून होत असल्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करावी ‘ असे आवाहन पदमविभूषण डॉ के एच संचेती यांनी केले
विश्वमाता फॉऊंडेशन च्या ‘ नेशनल इनोव्हेटिव्ह टीचर्स अवॉर्ड्स ‘ चे वितरण डॉ के एच संचेती यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले . तेव्हा ते बोलत होते .
प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय माहिती आयुक्त रवींद्र जाधव ,माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहायक सचिव अनिल गुंजाळ उपस्थित होते. यावेळी देशातील १६ शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला
डॉ संचेती म्हणाले ,’ शिक्षकांचा पेशा स्वीकारणाऱ्यांचे कौतुक आहे ,कारण एक संस्कारित पिढी शिक्षकाच्या हातून घडत असते . शिक्षक आणि डॉक्टर हा आदराचा पेशा आहे . शिक्षकांना तोच विषय सतत शिकवावा लागत असला तरी त्यात नावीन्य आणून प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने शिकवावे . शिक्षकाने ज्ञानाचे रूपांतर विद्वत्तेत करावे ‘
‘सारखे सत्कार समारंभ होणे योग्य नाही असे राजकीय नेते म्हणत असले तरी भारत हा इतका मोठा देश आहे की गुणवान शिक्षक किंवा अन्य गुणवान मंडळींचा सत्कार करायचा तर हजारो सत्कार समारंभ होणारच ‘असेही ते म्हणाले
‘शिक्षकांचे संस्कार जास्त काळ टिकतात ,त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे ‘ असे मनोगत विभागीय माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी यावेळी व्यक्त केले . तर शिक्षकांचे आयुष्य ज्ञानदानामुळे समाधानी जाते ‘ असे मनोगत अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले
प्रा . प्रकाश तेरेदेसाई (गुजरात ),विजय लुंगे (मेळघाट ),संतोष तळघट्टी (तिरुचिरापल्ली ),गुरुविंदर सिंग (इंदूर ),शरयू घाडी ,भटू देवरे ,रमेश रणदिवे ,सुनील मोरे अशा १६ शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले .
नंदकुमार वाळंज ,भाग्यश्री दांगट ,गिरीश जोशी ,पल्लवी तराळ ,गणेश शिंदे,वृषाली घाडगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
विश्वमाता फाउंडेशन चे अध्यक्ष शिवाजी घाडगे यांनी पुरस्कारामागची संकल्पना सांगितली