माय-लेकींच्या कथक प्रस्तुतीची ‘आवर्तन’ नृत्यसंध्या

Date:

पुणे – ‘आई माझा गुरु’ या उक्तीप्रमाणे आपल्या आईलाच गुरु मानून मुग्धा पाटणकर आणि सिद्धी अभय यांनी कथक नृत्यात प्राविण्य प्राप्त केले. आपल्या गुरुला कलेतून वंदन करण्याच्या कृतज्ञतापूर्वक उद्देशाने, उद्गारतर्फे ‘आवर्तन’ या नृत्यसंध्येचे येत्या 25 तारखेला आयोजन करण्यात आले आहे. कर्वे नगर येथील नवीन कर्नाटका शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सायं. 6 वाजता ही मैफल रंगणार आहे.

आसावरी व मुग्धा पाटणकर तसेच मनीषा व सिद्धी अभय यांच्या एकत्रित युगल सादरीकरणातून मैफलीस प्रारंभ होईल. त्यानंतर कथक परंपरेनुसार आसावरी आणि मुग्धा पाटणकर यांची युगल प्रस्तुती होईल. मैफलीच्या दुसऱ्या सत्रात मनीषा व सिद्धी अभय आपले युगल सादरीकरण करतील. सहभागी कलाकारांच्या एकत्रित प्रस्तुतीतून मैफलीची सांगता होईल.

आपल्या आईसमवेत आपली कला सादर करण्याची मुग्धा आणि सिद्धी यांना एकाच व्यासपीठावर लाभलेली संधी हे या मैफलीचे वेगळेपण म्हणावे लागेल.  गुरु पं. रोहिणीताई भाटे यांच्या आसावरी पाटणकर व मनीषा अभय या शिष्या आहेत.  रोहिणीताईंच्या कलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा तसेच कथकचा प्रचार व प्रसार व्हावा हा देखील या मैफलीमागील हेतू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मराठी जेंझीसाठी विशेष चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

*तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून नव्या प्रेक्षकवर्गाला जोडण्याचा प्रयत्न मुंबई, दि....

म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा आवश्यक उपाययोजना...

“सत्तेच्या विरोधकांना ‘नक्षली’ ठरवणे लोकशाहीवर आघात”; राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्यात — गोपाळदादा तिवारी

“सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी”; ‘दिमागी...

अमिताभ बच्चन यांचा मुंबईत मोठा रिअल इस्टेट व्यवहार; ३ मजले भाड्याने, ५ वर्षांत २१.८८ कोटींची कमाई

अंधेरी पश्चिममधील ‘सिग्नेचर’ इमारतीतील ८,४२८ चौ. फुटांची जागा ट्रूनॅटिव्हला;...