पुणे- शहरातील ऐतिहासिक लिमये नाट्य चित्र मंदिर अर्थात लक्ष्मी रस्त्यावरील विजय टाॅॅॅकीज आज पाडून जमीनदोस्त करण्यात आली . १९४५ साली हे चित्रगृह नाना लिमये यांनी सुरु केल्याची माहिती मिळते आहे . जिथे १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा झाला होता त्यास आबासाहेब मुजुमदार यांनी उपस्थिती लावली होती . सुरुवातीला इथे नाटके होत . नंतर याचे सिनेमागृह झाले. पूर्वी मॅॅटिनी ला इंग्लिश चित्रपट इथे बाळासाहेब सरपोतदार प्रदर्शित करत . असंख्य हिंदी ,मराठी चित्रपटांचे शो इथे गाजले. सुर्यकांत, चंद्रकांत , महेश कोठारे ,यासारखे असंख्य मराठी कलावंत इथे आवर्जून येत .
याच वास्तूच्या आवारातील कान्हेरे स्टुडिओ व अन्य दुकाने यापूर्वीच काळाच्या पडद्यामागे गेली . त्यानंतर विजय चित्र मंदिर त्यांच्या मालकाचे बांधकाम व्यवसायाचे कार्यालय आणि 1975 पासुन मनोरंजन चे कार्यालय येथे होते . जिथून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यालय सरपोतदार यांच्या निधनानंतर काही वर्षे चालविले जात , आणि अनेक नाट्यसंस्थांशी ते संबधित होते. बालचित्र महोत्सव याच सिनेमा गृहात भरत . लक्ष्मी रस्त्यावरील भानुविलास सिनेमा गृह बंद पडून कित्येक वर्षे उलटली , हे मात्र सुरु होते. कोरोना , लॉक डाऊन ला ते बंद झाले ,ते आज अखेरीस पाडले गेले. या ठिकाणी नेमके पुढे काय होणार आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे तशीच हि वास्तू काळाच्या पडद्या आड गेल्याचे अनेकांना वाईट हि वाटते आहे. याच सिनेमागृहाच्या समोरील इमारतीत दादा कोंडके यांचे ऑफिस होते सध्या ते विजय कोंडके यांच्या ताब्यात असल्याचे समजते.
विजय टाॅॅॅकीजला इतिहासाचा वारसा अनमोल आहे. पण तो सांगण्यास आज तरी कोणी पुढे आले नाही . बाळासाहेब निकम यांना या यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी एक आठवड्यात आम्ही पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती सांगू असे सांगत आज यावर अधिक माहिती द्यायला नकार दिला .